मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत 7 पाक सैनिक ठार; पाहा PAK POST उद्ध्वस्त होण्याचा LIVE VIDEO

भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत 7 पाक सैनिक ठार; पाहा PAK POST उद्ध्वस्त होण्याचा LIVE VIDEO

पाकला भारतीय सैन्याने शिकवला धडा...केलं जोरदार प्रत्युत्तर...पाहा VIDEO

पाकला भारतीय सैन्याने शिकवला धडा...केलं जोरदार प्रत्युत्तर...पाहा VIDEO

पाकला भारतीय सैन्याने शिकवला धडा...केलं जोरदार प्रत्युत्तर...पाहा VIDEO

  • Published by:  Meenal Gangurde

श्रीनगर, 13 नोव्हेंबर : आज पाकिस्तानने (Pakistan) LOC जवळील 3 भागांमध्ये शस्त्रसंघीचं (ceasefire violation) उल्लंघन करीत गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याचे (Indian Army) एक BSF अधिकारी, एक जवान शहीद झाले असून 3 स्थानिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या गोळीबारानंतर भारतानेही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारताने प्रत्युत्तरा दाखल केलेल्या कारवाईत दोन आयल डंप, चार फॉरवर्ड पोस्ट उद्ध्वस्त केलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून सातत्याने फायरिंग सुरू होती. याला प्रत्युत्तर देताना भारतीन सैन्याने प्रत्येक सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तर दिलं. काश्मिरमधील हाजी पीर तंगधार आणि गुरेज सेक्टरच्या पलीकडे पीओकेमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या तीन फॉरवर्ड पोस्ट उद्ध्वस्त करण्यात आल्या. ज्यामध्ये 6 ते 7 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. याशिवाय 3 कमांडोदेखील या प्रत्युत्तराच्या कारवाईत मारले गेले.

तर पुंजच्या सब्जियो सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने प्रत्युत्तरा दाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या दोन पोस्ट उद्ध्वस्त केला आणि दोन आयल डेपोदेखील नष्ट केले आहेत.

आज उरी येथील कमलकोटमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करीत कलमकोट व्यतिरिक्त बांदीपोराच्या गुजेर सेक्टर आणि कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये गोळीबार केला. यामध्ये एक BSF अधिकारी आणि एक जवान शहीद झाले. याशिवाय 3 स्थानिकांचा मृत्यू झाला. याशिवाय 6 स्थानिक जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे.

हे ही वाचा-ऐन दिवाळीत ऋषिकेशवर शोककळा! LOC वर पाकशी लढताना BSF चे अधिकारी राकेश डोवाल शहीद

मिळालेल्या माहितीनुसार गोळीबाराची सुरुवात शुक्रवारी सर्वात आधी उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील टंगडार व करनाह सेक्टरमधील धानी, सदपोरा, हाजीतारा आणि जद्दा चौकी आणि त्याच्या जवळीत स्थित नागरिकांच्या वस्त्यांपासून सुरू झाली. पाकिस्तानच्या गोळीबारापासून बचाव करण्यासाठी टंगडार वव करनाह सेक्टरमध्ये साधारण 12 कुटुंबीयांनी घर सोडून जवळील सुरक्षित भागांमध्ये हलविण्यात आले होते.

First published:

Tags: Indian army, Pakistan