आधी केली फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलवून 65 वर्षीय महिलेनं हातोड्यानं फोडलं तरुणाचं डोकं

आधी केली फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलवून 65 वर्षीय महिलेनं हातोड्यानं फोडलं तरुणाचं डोकं

65 वर्षीय महिलेनं फेसबुकवर एका तरुणाशी मैत्री केली. फोनकरून त्याला भेटायला बोलवलं. त्याला भेटण्यासाठी ही महिला ग्वालिअरवरून आग्राला आली.

  • Share this:

आग्रा, 04 नोव्हेंबर : फेसबुकवरून दिवसेंदिवस फसवणुकीची प्रकरणं वाढत आहे. फेक अकाउंट तयार करून मुलींना फसवणारी टोळीच तयार झाली आहे. अशा तरुणांना धडक शिकवण्यासाठी एका 65 वर्षीय महिलेनं अजब पाऊल उचललं. 65 वर्षीय महिलेनं फेसबुकवर एका तरुणाशी मैत्री केली. फोनकरून त्याला भेटायला बोलवलं. त्याला भेटण्यासाठी ही महिला ग्वालिअरवरून आग्राला आली. बाईकवरून बसून फिरत असताना सोबत आणलेल्या हातोड्यानं या महिलेनं तरुणाचं डोकं फोडलं. हा प्रकार पाहून पोलीसही थक्क झाले आहेत.

युवकावर हल्ला करणाऱ्या या महिलेनं फेसबुकवर हा तरुण मुलींना फसवण्याची कामं करतो, असे सांगितले. पोलिसांनी जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केले असून 65 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे.

वाचा-एका ‘फोन कॉल’मुळे गुंडांची टोळी जेरबंद, देहूरोडमध्ये करत होते दिवसा लुटमार

पोलीस निरीक्षक सिकंद्रा अरविंद कुमार यांनी नवभारत टाइम्सला दिलेल्या माहितीत, मथुरा येथील रहिवासी देवेंद्र न्यू आग्रा बायपासमधील रूग्णालयात कर्मचारी आहे. काही महिन्यांपूर्वी, त्याने फेसबुकवर एक सुंदर प्रोफाइल पाहून ग्वालिअरच्या तरूणीशी मैत्री केली. दोघांनी एकमेकांशी गप्पा मारण्यास सुरवात केली. त्याने मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअॅपवर गप्पा मारण्यास सुरवात केली. देवेंद्रनं या मैत्रीणीला भेटण्यास सांगितले. मात्र भेटायला आल्यानंतर देवेंद्रला कळलं की ही तरुणी नसून 65 वर्षांची महिला आहे. हे पाहून देवेंद्र संतापला.

वाचा-‘स्टंटबाज’ निघाला धोकेबाज, युट्यूबरनेच प्रेयसीच्या भावाची हत्या केल्याचं उघड

रागात हातोड्यानं डोकं फोडलं

देवेंद्रचं वागणं पाहून महिलेला राग आला. या महिलेनं देवेंद्रला बाईकनं बस स्थानकापर्यंत सोडायला सांगितले. बाईकवरून जात असताना महिलेनं पर्समधून हातोडा काढला आणि तरुणाच्या डोक्यात मारला. देवेंद्रनं बाईकवरून उडी मारली आणम पळू लागला. मात्र रक्तस्राव झाल्यामुळे तो बेशुद्ध पडला.

वाचा-अरेरे ! वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी 15 वर्षीय मुलाची आत्महत्या

पोलिसांनी महिलेला केली अटक

उपस्थित पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. तर देवेंद्रला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या पर्समध्ये मिर्ची पावडरही मिळाली. चौकशीदरम्यान या दोघांची फेसबुकवर मैत्री झाल्याचे सांगितले. महिलेनं सांगितले की, देवेंद्र फेसबुकवर तरुणींशी मैत्री करून त्यांना फसवतो, म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी हा प्लॅन केला.

Published by: Priyanka Gawde
First published: November 4, 2020, 10:26 AM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या