Elec-widget

60 वर्षांच्या आजींनी एका मिनीटात खाल्ल्या रेकॉर्डब्रेक इडल्या आणि...

60 वर्षांच्या आजींनी एका मिनीटात खाल्ल्या रेकॉर्डब्रेक इडल्या आणि...

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या दसरा उत्सवात इडली खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

  • Share this:

म्हैसुर, 01 ऑक्टोबर : इडली हा असा पदार्थ आहे, जो सर्वांनाच आवडतो. पण तुम्हाला कोणी सांगितलं की इडली खाण्याची स्पर्धा आहे, तर तुम्ही किती इडल्या एका मिनीटात खाऊ शकता? एक किंवा दोन. पण म्हैसुरमध्ये एका 60 वर्षांच्या आज्जींनी कमाल केली आहे. कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या दसरा उत्सवात इडली खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 60 वर्षांच्या आजींनी एका मिनीटात किती इडल्या खाल्ल्या याचा हिशोबही तुम्ही लावू शकत नाही

ही स्पर्धा खास करून महिलांसाठी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेकांना एका मिनीटात जास्तीत जास्त इडली खाणे बंधनकारक असते. या स्पर्धेत 60 वर्षांच्या सरोज्जमांनी कमाल केली आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सरोज्जमांनी 1 मिनीटात 6 इडल्या खाल्ल्या. म्हैसुरमध्ये नवरात्री उत्सवाबरोबर दसरा उत्सवाची सुरुवात होते. यावेळी चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून दसऱ्याच्या आधीपासून हा उत्सव साजरा केला जातो. या दरम्यान म्हैसुर पॅलेसपासून संपूर्ण शहराची सजावट केली जाते. यात 1 लाख छोटे-छोटे बल्ब लावून सजावट केली जाते. ही सजावट पाहण्यासाठी पर्यटकही गर्दी करतात.

रविवारपासून झाली उत्सवाला सुरुवात

पारंपरिक ऋढी परंपरासह रविवारी या उत्सवाला सुरुवात झाली. यावेळी म्हैसुरचे महाराज यदुवीर कृष्णादत्त चमराजा यांनी पूजा अर्चना करत सुवर्ण सिंहासनावर बसून दरबार भरवला. या पारंपरिक उत्सवाचे उद्घाटन प्रसिध्द कर्नाटक लेखक एस. एल. भैरप्पा आणि मंत्री प्रल्दाज जोशी यांनी केले.

चांमुडा देवीला केले जाते समर्पित

Loading...

या उत्सवाची सुरुता 1610पासून झाली होती. या उत्सवादरम्यान मिरवणूक व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यावर्षापासून या उत्सवाचे आयोजन म्हैसुरमध्ये केले जाते. एकीकडे संपूर्ण देशात रामानं रावणावर मिळवलेला विजय यादिवशी साजरा केला जातो. तर, म्हैसुरमध्ये याच दिवशी चामुंडा देवीनं महिशासुर वध केला होता, म्हणून दसरा साजरा केला जातो.

VIDEO: 'पक्षासोबत प्रामाणिक राहणं गुन्हा असेल तर तो मी केलाय'; खडसेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2019 05:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...