VIDEO : 6 वर्षांच्या लहानग्यानं जोरबैठका काढून आईबाबांना मिळवून दिलं घर

VIDEO : 6 वर्षांच्या लहानग्यानं जोरबैठका काढून आईबाबांना मिळवून दिलं घर

सध्या घर घेणं हे खूप कठीण काम झालं आहे. त्यासाठी कायकाय करावं लागतं हे घर घेऊन पाहणाऱ्यालाच माहीत असतं. पण एका लहानग्याने जोरबैठका काढून आपल्या कुटुंबासाठी घर मिळवलं आहे.

  • Share this:

मॉस्को, 9 जुलै : सध्या घर घेणं हे खूप कठीण काम झालं आहे. त्यासाठी कायकाय करावं लागतं हे घर घेऊन पाहणाऱ्यालाच माहीत असतं. पण एका लहानग्याने जोरबैठका काढून आपल्या कुटुंबासाठी घर मिळवलं आहे. जोरबैठका काढून असं महागडं बक्षीस मिळवण्याचा विक्रम करणारा तो रशियामधला दुसरा मुलगा आहे.

इब्राहीम लॅनोव्ह या रशियामधल्या मुलाने 3 हजार 270 जोरबैठका काढण्याचा विक्रम केला आणि एक अपार्टमेंट बक्षीस म्हणून मिळवली. एवढ्या जोरबैठका तर फिटनेस तज्ज्ञही काढू शकत नाहीत पण इब्राहीमने त्यांचं रेकॉर्ड मोडलं.

रशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

या मुलाचा जोरबैठकांचा हा विक्रम रशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवला गेला आहे. त्याने हा विक्रम नोंदवल्यानंतर त्याला एका स्थानिक स्पोर्टस क्लबमध्ये घर देण्यात आलं. याच ठिकाणी इब्राहीमने त्याच्या वडिलांसोबत जाऊन जोरबैठका काढण्याचा सराव केला होता.

उर्मिला मातोंडकर यांचं ते पत्र नेमकं कुणी केलं उघड?

रशियामध्ये असा विक्रम करणारा इब्राहीम हा एकटा मुलगा नाही. मागच्या वर्षीही एका पाच वर्षांच्या मुलाने जोरबैठकांचा विक्रम करून मर्सिडीज बक्षीस मिळवली होती. त्याने 4 हजार 105 जोरबैठका काढल्या होत्या.त्याचाही विक्रम रशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आला होता.

===============================================================================

VIDEO: फेसबुक प्रेम पडलं महागात; ग्रामस्थांनी दहशतवादी समजून दिला चोप

First published: July 9, 2019, 6:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading