खेळताखेळता कॉम्प्रेसरसमोर आला लहानगा, तोंडात हवा गेल्याने गेला जीव...

खेळताखेळता कॉम्प्रेसरसमोर आला लहानगा, तोंडात हवा गेल्याने गेला जीव...

इंदौरच्या भवरकुआँ क्षेत्रात एका कारखान्यामध्ये विदारक घटना घडली. दलिया बनवणाऱ्या कारखान्यात एक सहा वर्षांचा मुलगा खेळताखेळता चुकून कॉम्प्रेसरसमोर आला आणि त्याच्या तोंडात हवा गेली. यामुळे या लहानग्याचा जीव गेला.

  • Share this:

इंदौर, 29 जुलै : इंदौरच्या भवरकुआँ क्षेत्रात एका कारखान्यामध्ये विदारक घटना घडली. दलिया बनवणाऱ्या या कारखान्यात एक सहा वर्षांचा मुलगा खेळताखेळता चुकून कॉम्प्रेसरसमोर आला आणि त्याच्या तोंडात हवा गेली. यामुळे या लहानग्याचा जीव गेला. त्याच्या तोंडात हवा गेल्यानंतर लगेचच त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण त्याचा जीव वाचू शकला नाही.

इथल्या वनवानी अ‍ॅग्रो लिमिटेड या कारखान्याच्या परिसरातल्या इमारतीत काही मजूर कुटुंब राहतात. इथेच राहणारे रामचंद्र यादव यांचा मुलगा कान्हा त्याच्या बहिणीसोबत कारखान्याच्या परिसरात खेळत होता. रविवारी ही कारखाना बंद होता. शिफ्ट संपल्यानंतर एक कर्मचारी कॉम्प्रेसरची सफाई करत होता. त्याचवेळी अचानक खेळताखेळता कान्हा या कॉम्प्रेसरसमोर आला. कॉम्प्रेसरमधली हवा त्याच्या तोंडात गेल्याने त्याची घुसमट झाली.

त्याच्या पोटातही दुखू लागलं. त्याच्या किंकाळ्या ऐकून बाकीचे मजूरही तिथे आले आणि त्याला घरी घेऊन गेले. कान्हाचे वडिल लगेचच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण त्याचा जीव वाचवू शकले नाही. कान्हा मूळचा ओडिशाचा राहणारा आहे.

(हेही वाचा : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भूकंप; पवारांच्या जवळचाच नेता करणार भाजपात प्रवेश?)

कॉम्प्रेसरमधून निघणाऱ्या हवेचा दाब जास्त असतो. जोराने हवा तोंडात गेल्याने कान्हाच्या फुफ्फुसांवर दाब आला. यामुळे या लहानग्याला श्वास घेणंही कठीण झालं.

याआधी, कान्हाची बहीण खुशीने त्याच्या तोंडात कॉम्प्रेसरचा पाईप टाकला,असं बोललं जात होतं. पण या कॉम्प्रेसरमधून निघणाऱ्या हवेमुळेच कान्हाचा मृत्यू ओढवला. ही घटना घडली तेव्हा तिथे जो सफाई कर्मचारी होता तो मात्र पळून गेला. पोलीस आता या कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत.

===============================================================================

man vs wild: पंतप्रधान मोदींचा अ‍ॅडव्हेंचरस अंदाज; पहिला टीझर रिलीज, पाहा VIDEO

First published: July 29, 2019, 3:53 PM IST
Tags: accident

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading