Home /News /national /

आता बोर्ड परीक्षांवरही सत्ताधारी पक्षाचा प्रभाव? बारावीच्या प्रश्नपत्रिकेत काँग्रेसबद्दलचे 6 प्रश्न; नव्या वादाला सुरुवात

आता बोर्ड परीक्षांवरही सत्ताधारी पक्षाचा प्रभाव? बारावीच्या प्रश्नपत्रिकेत काँग्रेसबद्दलचे 6 प्रश्न; नव्या वादाला सुरुवात

सध्या राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे या प्रश्नपत्रिकेवरून नवा वाद (Controversial questions about congress) सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    राजस्थान, 22 एप्रिल: सहसा राज्यशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एखाद्या विशिष्ट पक्षाला अनुसरून प्रश्न विचारले जात नाहीत. मात्र, राजस्थान बोर्डाच्या बारावीच्या प्रश्नपत्रिकेत काँग्रेसबद्दलचे सहा प्रश्न विचारण्यात आल्याचं समोर आलं आहे. गुरुवारी (21 एप्रिल) राजस्थानात बारावीच्या राज्यशास्त्र (Rajasthan Board 12th Standard Political Science) विषयाची परीक्षा पार पडली. या प्रश्नपत्रिकेत काँग्रेसचे कौतुक करणारे (Questions praising congress) काही प्रश्न विचारण्यात आले होते. सध्या राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे या प्रश्नपत्रिकेवरून नवा वाद (Controversial questions about congress) सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय होते प्रश्न? बारावीच्या राज्यशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत “ ‘गरीबी हटाओ’ हे घोषवाक्य कोणाचं होतं?”, “काँग्रेसचा सामाजिक आणि वैचारिक युती स्पष्ट करा”, “काँग्रेसने 1984 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत किती जागा जिंकल्या होत्या?”, “पहिल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचं वर्चस्व होतं?”, “1971 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुका काँग्रेसला नवसंजीवनी देणाऱ्या ठरल्या, या वाक्याचं स्पष्टीकरण द्या.” आणि “काँग्रेसने 1967च्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या परिस्थितीमध्ये लढल्या आणि त्याने काय जनादेश मिळाला?” असे सहा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते. यातील जवळपास पाच प्रश्न हे काँग्रेसची वाहवा (Rajasthan Board 12th Exam) करणारे आहेत, त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यासोबतच, कम्युनिस्ट पक्षाचे विभाजन आणि बसप पक्षाबाबतही एक-एक प्रश्न विचारण्यात आला होता. अभ्यासक्रमात धडा असल्याचे तज्ज्ञांचे मत काही शिक्षणतज्ज्ञांच्या मते, राजस्थान बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्रामध्ये ‘एकाच राजकीय पक्षाचं वर्चस्व आणि काँग्रेसची कार्यपद्धती : आव्हानं आणि स्थापना’ (Dominance of one Political Party chapter) असा धडा आहे. त्यामुळे काँग्रेसबाबत (Questions about congress in board exams) प्रश्न विचारले जाणं स्वाभाविक आहे. मात्र, प्रश्नांचे स्वरूप आणि प्रमाण याबाबत शिक्षणतज्ज्ञांनीदेखील आश्चर्य व्यक्त केलं. या वर्षी सीबीएसई (CBSE) बोर्ड परीक्षांमध्येही ‘2002 च्या गुजरात दंगलींवेळी राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार होते?’ अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, यावरून बराच गदारोळ झाल्यानंतर हा प्रश्न रद्द करुन त्याचे मार्क सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. आता जर राजस्थान बोर्डाने दिलेले हे प्रश्न चुकीचे ठरले, तर नियमांनुसार हे प्रश्नदेखील रद्द करून, विद्यार्थ्यांना त्याचे मार्क द्यावे लागणार आहेत. अर्थात, राजस्थान बोर्डाने (RBSE) अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राजस्थान बोर्डाच्या बारावीतील विद्यार्थ्यांची परीक्षा मार्चमध्ये सुरू झाली होती. काही दिवसांमध्येच ही परीक्षा संपणार आहे. मे महिन्यात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी राजस्थान बोर्डाच्या बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांपैकी 91.96 टक्के विद्यार्थी पास झाले होते, तर बारावी कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांपैकी अनुक्रमे 94.49 टक्के आणि 90.70 टक्के विद्यार्थी पास झाले होते.
    First published:

    Tags: Board Exam, CBSE 12th, Rajasthan, State Board

    पुढील बातम्या