• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • बालाजी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, 6 जण ठार

बालाजी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, 6 जण ठार

माहिती मिळताच स्थानिक पोलीस याठिकाणी पोहोचले आहेत. दरम्यान पोस्ट मार्टमसाठी मेडिकल कॉलेजमध्ये या 6 जणांचे मृतदेह पाठवण्यात आले आहे. दरम्यान पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 • Share this:
  कनौज, 13 फेब्रुवारी: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कनौज जिल्ह्यामधून (Kanauj) भीषण अपघाताची घटना समोर येते आहे. याठिकाणच्या तालग्राम परिसरात आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवे (Agra Lucknow Express) हा अपघात झाला आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने (Car Accident) हा अपघात झाल्याची माहिती समोर येते आहे. या अपघातात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कारमधील सर्व व्यक्ती लखनऊहून मेहदीपूर याठिकाणी बालाजीच्या दर्शनास निघाले होते. माहिती मिळताच स्थानिक पोलीस याठिकाणी पोहोचले आहेत. दरम्यान पोस्ट मार्टमसाठी मेडिकल कॉलेजमध्ये या 6 जणांचे मृतदेह पाठवण्यात आले आहे. दरम्यान पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनी कनौजमध्ये घडलेल्या या घटनेबाबत (Road Accident) दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पीडितांच्या नातेवाईकांची मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. (हे वाचा-सामान्यातला हिरो! दोन्ही मुलांना गमावल्यानंतर 7 जणांची घेतली जबाबदारी) दरम्यान गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघात वाढत आहेत. 9 फेब्रुवारी रोजी एका महिलेचे अंत्यसंस्कार करून परतणाऱ्या पिकअपला अपघात झाल्याने 5 लोकांचा मृत्यू झाला होता, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याच अपघातात अन्य 5 व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. यापैकी एकाला उपचारासाठी वाराणसी याठिकाणी हायर सेंटरमध्ये पाठवण्याचे रेफर करण्यात आले होते. हा अपघात जलालपूर हायवे- वाराणसी सीमवर झाला होता. वेगाने येणारी पिकअप ट्रकवर आदळून हा अपघात झाला होता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: