मराठी बातम्या /बातम्या /देश /डास मारण्याच्या कॉइलमुळे कशी लागली आग? असं नेमकं का घडलं ज्यामुळे 6 जणांचा गेला बळी

डास मारण्याच्या कॉइलमुळे कशी लागली आग? असं नेमकं का घडलं ज्यामुळे 6 जणांचा गेला बळी

घटनास्थळावरचा फोटो

घटनास्थळावरचा फोटो

डास मारण्याच्या कॉइलमुळे आग लागल्याने तब्बल 6 जणांचा मृत्यू झाला.

  • Local18
  • Last Updated :
  • New Delhi, India

शंकर आनंद, प्रतिनिधी

नवी दिल्ली, 31 मार्च : थोडासा निष्काळजीपणा अनेकांना त्रासदायक ठरू शकते, त्यामुळे ही बातमी तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. डासांपासून बचाव करणाऱ्या अगरबत्तीने एक संपूर्ण कुटुंब कसे उद्ध्वस्त झाले, हे जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचणे महत्त्वाचे आहे.

दिल्लीच्या उत्तर पूर्व जिल्ह्यातील शास्त्री पार्क परिसरात एक अतिशय दुःखद घटना घडली. याठिकाणी एकाच कुटुंबातील 6 लोकांचा मृत्यू झाला. घराला आग लागून आणि गुदमरून या सर्व 6 जणांचा मृत्यू झाला. ही घटना 30 मार्चच्या रात्री घडली. हसमत अली नावाच्या व्यक्तीच्या घरात त्याच्या कुटुंबातील सर्व 9 सदस्य झोपले असताना रात्रीच्या वेळी मच्छरनाशक अगरबत्तीमुळे एका अंथरुणाला आग लागली. त्यानंतर घरात झोपलेल्या 9 सदस्यांपैकी 6 जणांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यावर शुक्रवारी 31 मार्च रोजी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांचे पथक तेथे गेल्यावर तेथे उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने तिघांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. उर्वरितांचा जागीच मृत्यू झाला. या माहितीला रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दुजोरा दिला. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तर, रुग्णालयात उपचार सुरू असताना 22 वर्षीय तरुणाला प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले.

ही घटना नेमकी कशी घडली -

घटनास्थळी पोलीस पथक आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कुटुंब प्रमुख हसमत अली यांच्या कुटुंबीयांनी रात्री झोपेत असताना त्यांच्या घरात डास प्रतिबंधक अगरबत्ती पेटवली होती. सर्व डास मरतील किंवा किंवा पळून जातील यासाठी त्यांनी त्यावेळी सर्व दरवाजे आणि घराच्या आतील खिडक्याही बंद केल्या होत्या.

परंतु घरात कार्बन मोनॉक्साईड वायू भरला होता. त्यानंतर गुदमरल्यामुळे लोक बेशुद्ध झाले. त्याच वेळी झोपण्याच्या पलंगाच्या जवळ असलेल्या अंथरुणाला त्याच अगरबत्तीने आग लागली. घरातील सदस्य यावेळी झोपेत होते. मात्र, दुसरीकडे आगीने भयानक रुप धारण केले, आणि त्यामुळे लागलेल्या या भयंकर आगीत सहा जणांचा मृत्यू झाला. तर तीन जणांना स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या पथकाने वाचविले आहे.

First published:
top videos

    Tags: Death, Delhi, Local18