Ola च्या गाड्यांवर 6 महिन्यांसाठी बंदी

Ola च्या गाड्यांवर 6 महिन्यांसाठी बंदी

कर्नाटक वाहतूक विभागाने 'Ola Cabs चा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्याचे आदेश दिेले आहेत. Ola cabs वर राज्यभर बंदी आणण्याचे हे आदेश आहेत, असं सूत्रांनी News 18 ला सांगितलं.

  • Share this:

बंगळुरू, 22 मार्च : कर्नाटक वाहतूक विभागाने 'Ola Cabs चा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्याचे आदेश दिेले आहेत. ओला कॅब्ज वर राज्यभर बंदी आणण्याचे हे आदेश आहेत, असं सूत्रांनी News 18 ला सांगितलं.

'Ola Cabs ने कर्नाटकमधल्या वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येतेय, असं एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं. वाहतूक विभागाच्या या आदेशानुसार, 'Ola Cabs ला दुचाकी सेवेचा परवाना नव्हता. पण तरीही 'Ola Cabs ने कर्नाटकमध्ये बाइक पुरवण्याची सेवा सुरू केली आहे.

याबद्दल Ola कंपनीला नोटीस पाठवण्यात आली होती. कंपनीला एक आठवड्यात उत्तर देण्याचे आदेशही देण्यात आले होते. या कंपनीचं उत्तर समाधानकारक न वाटल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

'Ola Cabs ने पहिल्यांदा मुंबईमध्ये त्यांचं ऑफिस थाटलं होतं. हे ऑफिस नंतर बंगळुरूला हलवण्यात आलं. या कंपनीच्या कर्नाटकमध्ये सुमारे 10 हजार कार आहेत. म्हैसूर, मंगळुरू, हुबळी आणि बंगळुरू या सगळ्या शहरात ही सेवा सुरू आहे.

कर्नाटक सरकारच्या या आदेशानंतर, आपण यावर तोडगा काढू, असं 'Ola Cabs ने म्हटलं आहे. कर्नाटकमध्ये या कंपनीच्या 10 हजार गाड्या असल्याने अनेक टॅक्सीचालकांची नोकरी यावर अवलंबून आहे तसंच कर्नाटकमधल्या नागरिकांनाही वाहतुकीच्या सोयीसुविधा हव्या आहेत, असंही कंपनीने आपल्या अधिकृत पत्रात म्हटलं आहे.

याआधी Uber ही कंपनी महिलांच्या सुरक्षेबद्दल वादात सापडली होती.आता Ola Cabs ने नियम न पाळल्यामुळेही कंपनीही अडचणीत सापडली आहे. त्यावर ही कंपनी यावर काय तोडगा काढते ते पाहावं लागेल.


===============================================================================================

SPECIAL REPORT : राजे, तुम्ही चुकला!बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2019 08:52 PM IST

ताज्या बातम्या