Elec-widget

पाकिस्तानच्या 370च्या विरोधाला काश्मिरींचे 575चे उत्तर!

पाकिस्तानच्या 370च्या विरोधाला काश्मिरींचे 575चे उत्तर!

पाकिस्तानकडून केला जाणारा खोटा, पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या अशा कोणत्याही गोष्टींना बळी न पडता जम्मू-काश्मीरमधील 575 तरुण आज भारतीय लष्करात भर्ती झाले.

  • Share this:

श्रीनगर, 31 ऑगस्ट: जम्मू्-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने थयथयाट सुरु केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा नेण्याचा पाकचा प्रयत्न फसल्यानंतर आता दहशतीचा मार्ग अवलंबला आहे. काश्मीर खोऱ्यातील मुस्लिम जनतेला भडकावण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात असताना काश्मिरी जनतेने त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तानकडून केला जाणारा खोटा, पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या अशा कोणत्याही गोष्टींना बळी न पडता जम्मू-काश्मीरमधील 575 तरुण आज भारतीय लष्करात भर्ती झाले. पाकिस्तान जगभरात भारत काश्मीरमध्ये अत्याचार करत असल्याचा प्रचार करत असताना त्याला काश्मिरी जनतेने सडेतोड उत्तर दिले आहे.

कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत सामान्य होत आहे. गेल्या काही दिवासांपासून राज्यातील लोकांना अनेक बंदीमुळे अडचणीचा सामना करावा लागला होता. पण आता काश्मीर पुन्हा सुरळीत सुरु झाले आहे. काश्मीर खोऱ्यातील अनेक जवान देशसेवा करण्यासाठी पुढे आले आहेत. जम्मू-काश्मीर लाइट इन्फेंट्री रेजिमेंट सेंटरच्या पासिंग आऊट परेडमध्ये याचा अनुभव सर्वांना पाहता आला. श्रीनगरमध्ये शुक्रवारी रेजिमेंट सेंटरच्या पासिंग आऊट परेडमध्ये 575 युवकांनी सेंटरमध्ये प्रवेश केला. या प्रवेश करणाऱ्यापैकी एक असलेल्या श्रीनगरच्या वसीम अहमद मीर म्हणाला माझे वडील लष्करात होते. लष्कराचा गणवेशने मला प्रेरणा दिली.

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघात हा मुद्दा उपस्थित केला. काश्मीर हा एक आंतरराष्ट्रीय प्रश्न असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पण चीन शिवाय अन्य कोणत्याही देशाने त्याला पाठिंबा दिला नाही. त्यानंतर पाकिस्तानने भारताला युद्धाची धमकी देण्यास सुरुवात केली. प्रथम पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, त्यानंतर खुद्द पंतप्रधान इम्रान खान आणि रेल्वे मंत्र्यांनी तर युद्धाची तारीख देखील सांगून टाकली होती.

Loading...

भरधाव ट्रकची बसला धडक, भीषण दुर्घटनेचा CCTV VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 03:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...