Home /News /national /

सर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना ऑन द स्पॉट भरावा लागणार भरभक्कम दंड

सर्वात स्वच्छ शहर होणार आणखी स्वच्छ, कचरा फेकणाऱ्यांना ऑन द स्पॉट भरावा लागणार भरभक्कम दंड

भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळवलेल्या इंदूर (Indore) नगरपालिकेनं यापुढे रस्त्यावर कचरा (Garbage) फेकणाऱ्य़ांकडून जागेवर 5 हजार रुपयांचा दंड (Rs. 5000 fine) वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत देशात तिसऱ्या स्थानी असलेली नवी मुंबई महापालिकाही (Navi Mumbai Municiple Corporation) असाच निर्णय घेणार का, याकडं सर्वांचं लक्ष आहे.

पुढे वाचा ...
    इंदूर, 26 जुलै : एखाद्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेने शहर स्वच्छ ठेवण्याचा निर्णय घेतला तरी नागरिकांच्या सहभागाविषयी कुठलीच मोहिम यशस्वी होऊ शकत नाही. भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळवलेल्या इंदूर (Indore) नगरपालिकेनं यापुढे रस्त्यावर कचरा (Garbage) फेकणाऱ्य़ांकडून जागेवर 5 हजार रुपयांचा दंड (Rs. 5000 fine) वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत देशात तिसऱ्या स्थानी असलेली नवी मुंबई महापालिकाही (Navi Mumbai Municiple Corporation) असाच निर्णय घेणार का, याकडं सर्वांचं लक्ष आहे. काय आहे नवा नियम? इंदूर शहरात स्वच्छता राखण्यासाठी महानगरपालिकेनं विविध उपाययोजना राबवल्या आहेत. त्यामध्ये रोजच्या रोज कचरा उचलणे, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवणे, कचऱ्याचं वर्गीकरण आणि त्याचं रिसायकलिंग अशा नियोजनबद्ध रितीनं शहरातील कचऱ्याचं व्यवस्थापन केलं आहे. मात्र रातोरात रस्त्यावर, मैदानात किंवा इतर ठिकाणी नागरिक कचरा आणून टाकत असल्यामुळे पालिकेच्या मोहिमेचा उद्देश साध्य होत नसल्याचं चित्र आहे. कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन केलं असताना आणि पालिकेकडून रोजच्या रोज कचरा उचलला जात असताना अशा प्रकारे रस्त्यावर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्याचं काम काही समाजकंटक नागरिक करत आहेत. अशा नागरिकांना आता दंडाची तरतूद पालिकेनं केली आहे. कुणीही रस्त्यावर कचरा फेकताना दिसलं, तर जागेवरच त्याच्याकडून 5 हजार रुपयांच्या दंडाची वसुली केली जाणार आहे. कचऱ्याचं प्रमाण जास्त असेल, तर हा दंड वाढूही शकतो, असा इशारा पालिकेनं दिला आहे. हे वाचा -मुंबईत सख्ख्या मेहुण्यावर दारुच्या बाटलीने सपासप वार; धक्कादायक कारण आलं समोर इंदौर 311 इंदूर नगरपालिकेनं ‘इंदौर 311’ नावाचं ऍप नागरिकांसाठी सुरू केलं आहे. एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला कचरा टाकून द्यायचा असेल, तर ते या ऍपवर नोंदणी करू शकतात. मग पालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाची टीम येऊन हा कचरा घेऊन जाते. हा कचरा उचलण्यासाठी पालिकेनं ठराविक शुल्क निश्चित केलं आहे. ते शुल्क भरून सर्वसामान्य नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे रस्त्यावर कचरा फेकून दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याऐवजी निर्धारित माफक रक्कम भरून रितसर कचरा द्यावा, असं आवाहन पालिकेनं केलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Indore, Indore News

    पुढील बातम्या