मराठी बातम्या /बातम्या /देश /बहिणीच्या लग्नात अडचण निर्माण करत होती महिला, भावाने थेट विषयच संपवला

बहिणीच्या लग्नात अडचण निर्माण करत होती महिला, भावाने थेट विषयच संपवला

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

50 वर्षीय महिलेसोबत धक्कादायक कृत्य घडले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Basti, India

कृष्ण गोपाल द्विवेदी, प्रतिनिधी

बस्ती, 21 मार्च : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. हत्या, आत्महत्या, तसेच प्रेम प्रकरणातून खुनाच्याही धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्यांचाच खून झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

उत्तरप्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात ही घटना घडली. 19 मार्च रोजी बस्ती जिल्ह्यातील रुधौली पोलीस ठाण्याच्या सेमरा गावात एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मोहरीच्या शेतात एका 50 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला होता.

मृताच्या डोक्यावर दगडाने वार करण्याबरोबरच धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी बस्ती एसपींनी महिलेच्या हत्येबाबत खुलासा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अजयकुमार यादव याला अटक केली आहे. पोलीस तपासात याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे.

या हत्याकांडाचे कारण धक्कादायक आहे. मृत महिला आरोपीच्या बहिणीच्या लग्नात अडथळा आणत होती. त्यामुळे तिच्या बहिणीचे लग्न होत नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये खूप तणाव असायचा आणि रोज वाद व्हायचे.

एसपी बस्ती गोपाल चौधरी यांनी सांगितले की, आरोपी अजय कुमार यादव हा मृताचा दीर होता. मृत महिला आरोपीच्या बहिणीच्या लग्नात अडथळा आणत होता. ज्यावेळी आरोपीच्या बहिणीचे लग्न होत असे, त्यावेळी मृत महिला ही विवाहात अडसर ठरत असे. त्यामुळे अजयच्या बहिणीचे लग्न होऊ शकले नाही. त्यामुळे त्याने या महिलेची हत्या केली.

आरोपीने चौकशीत सांगितले की, 19 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तो शेतात गेला होता. शेताच्या शेजारीच मृत महिलेचे शेत आहे. जेव्हा मी माझ्या शेताजवळ पोहोचलो तेव्हा मृत महिलेने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिने माझ्यावर विटांचा तुकडा फेकला, त्यामुळे मी संतापलो आणि रागाच्या भरात तिच्या डोक्यावर वीट मारली. तेव्हा ती खाली पडली. त्यानंतर तिच्या हातातील विळा घेऊन तिच्या गळ्यावर वार करत तिची हत्या केल्याचे आरोपीने सांगितले. तसेच यानंतर मृतदेह टाकून तो घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Local18, Marriage, Murder