Home /News /national /

घशात 5 रुपयांचं नाणं घेऊन वावरत राहिला 4 वर्षांचा चिमुरडा, जेवताना आई-वडिलांच्या आलं लक्षात, शेवटी...

घशात 5 रुपयांचं नाणं घेऊन वावरत राहिला 4 वर्षांचा चिमुरडा, जेवताना आई-वडिलांच्या आलं लक्षात, शेवटी...

चित्रकूटच्या कर्वी येथील आनंद किशोर चौधरी यांचा मुलगा आर्यन याच्या गळ्यात खेळताना पाच रुपयांचे नाणे त्याने गिळून घेतले होते.

    चित्रकूट, 27 जून : एका चार वर्षीय मुलाने पाच रुपयांचे नाणे (5 Rupee Coin) गळ्यात अकडल्याची घटना एक धक्कादायक उत्तरप्रदेश राज्यातील चित्रकूट (Chitrakut) येथे घडली. चार वर्षीय आर्यनच्या गळ्यात पाच रुपयांचे नाणे गेल्याने त्याचे घरचे फारच तणावात होते. तब्बल तीन दिवस त्यांनी रुग्णालयात फेऱ्या घातल्या. मात्र, समस्या न सुटल्याने त्यांनी आर्यनला घेऊन मध्यप्रदेश राज्यातील सतना येथील जिल्हा रुग्णालयात (Satna District Hospital) धाव घेतली. नेमकं काय घडलं -  मध्यप्रदेशातील सतना येथे असलेल्या जिल्हा रुग्णालयात धाव घेतल्यानंतर येथील बालरोगतज्ञ डॉ. संजीव प्रजापति अत्यंत काळजीने चार वर्षीय आर्यनच्या गळ्यात अडकलेले पाच रुपयांचे नाणे काढले. यानंतर नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला. चित्रकूटच्या कर्वी येथील आनंद किशोर चौधरी यांचा मुलगा आर्यन याच्या गळ्यात खेळताना पाच रुपयांचे नाणे त्याने गिळून घेतले होते. यानंतर त्याला गळ्यात त्रास होऊ लागला. तसेच अन्न गिळणेही कठीण झाले होते. कारवी आणि बांदा येथील डॉक्टरांनी हात वर केल्यावर आनंद किशोर यांनी नातेवाईकाच्या मदतीने मुलाला सतना जिल्हा रुग्णालयात नेले. रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ.संजीव प्रजापती यांनी मुलाच्या संपूर्ण शरीराचा एक्स-रे काढला. तेव्हा मुलाच्या अन्ननलिकेत क्वाईन अडकल्याचे आढळून आला. त्यांनी त्यांचे ज्येष्ठ आणि बालरोगतज्ञ डॉ. सुनील कारखुर यांच्याशी सल्लामसलत केली आणि हे क्वाईन दुर्बिणीच्या साहाय्याने काढले जाणार नसून फॉलीज कॅथेटरच्या (Foley's Catheter) साहाय्याने काढले जाणार असल्याचे ठरवले. यानंतर डॉक्टरांनी नर्सिंग स्टाफ सुनैना रजक, संगीता पटेल आणि सपोर्टिंग स्टाफच्या मदतीने पाच रुपयांचे नाणे काढले. हेही वाचा - Whatsapp Hack : अँड्रॉइड फोनवर टाइप न करता पाठवता येतो मेसेज, पाहा कसे पाठवाल मेसेज बालरोगतज्ञांनी पर्याय म्हणून फॉलीज कॅथेटरची बलूनिंग पद्धत वापरली. वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ डॉक्टरांकडून त्यांनी हे शिकले होते. त्यामुळे त्यांनी मुलाच्या गळ्यात अडकलेले नाणे सहज बाहेर काढले. आता आर्यन धोक्याच्या बाहेर आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Madhya pradesh, Uttar pradesh

    पुढील बातम्या