Home /News /national /

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा ग्रामस्थांवर बेछूट गोळीबार; 5 जणांचा मृत्यू

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा ग्रामस्थांवर बेछूट गोळीबार; 5 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा बिमोड करण्याकरता राष्ट्रीय तपास यंत्रणेनं 900 लोकांना ताब्यात घेण्याची मोठी कारवाई केली असतानाच ईशान्येकडे कुकी अतिरेक्यांनी मोठा हल्ला करत सरकारला आव्हान दिलं आहे.

मणिपूर 13 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडील (Eastern State) दुर्गम राज्यांच्या विकासावर लक्ष केंद्रीत करून या भागाचा कायापालट घडवून आणला आहे. इथे रस्ते, इंटरनेटसारख्या आधुनिक सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. यामुळे प्रगतीची नवी दारे खुली होत असतानाच कुकी अतिरेक्यांची (Kuki Militants) समस्याही पुन्हा डोके वर काढत असल्याचं दिसत आहे. जम्मू-काश्मीरप्रमाणे इथंही वारंवार दहशतवादी हिंसाचार करत असतात. दहशतवाद्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी सुरक्षा दले वारंवार शोधमोहीम राबवत असतात. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा बिमोड करण्याकरता राष्ट्रीय तपास यंत्रणेनं 900 लोकांना ताब्यात घेण्याची मोठी कारवाई केली असतानाच ईशान्येकडे कुकी अतिरेक्यांनी मोठा हल्ला करत सरकारला आव्हान दिलं आहे. या 2 कारणांमुळे देशात कोळशाचा तुटवडा; कधीपर्यंत करावा लागणार सामना? टाईम्स नाऊ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, मणिपूरमधील (Manipur) कांगपोकपी जिल्ह्यातील बी गॅमनोम (B Gamnom) गावात सुरक्षा दलाशी (Security) झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन अतिरेक्यांच्या अंत्यसंस्कारात (Cremation) सहभागी होण्यासाठी जमलेल्या ग्रामस्थांवर (Villagers) कुकी अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार (Firing) केला. यात 5 जण मरण पावले. या हिंसाचारामुळे या भागात तणाव निर्माण झाला असून, गावकरी घाबरले आहेत. अनेक गावकरी गाव सोडून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एन बीरेन सिंह यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, रविवारी माफू धरणाजवळ सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत चार कुकी अतिरेकी ठार झाले. या अतिरेक्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी गावकरी जमले होते. त्यांच्यावरच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात पाच जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला. जखमी झालेल्या किशोरवयीन मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलाने 800 किलोमीटर पाठलाग करून केला बापाच्या प्रेमप्रकरणाचा भांडाफोड या गोळीबारात ठार झालेल्या तीन लोकांचे मृतदेह हाती लागले असून, उर्वरीत दोन मृतदेह अद्याप हाती आलेले नाहीत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली असल्याची माहिती आयजी ल्युसेह किप्गेन (IG Lunseih Kipgen) यांनी दिली आहे.
First published:

Tags: Gun firing, Terrorist attack

पुढील बातम्या