Home /News /national /

'नवनीत राणांसह 5 खासदार बनावट जात प्रमाणपत्रावर लोकसभेत निवडून गेले' माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

'नवनीत राणांसह 5 खासदार बनावट जात प्रमाणपत्रावर लोकसभेत निवडून गेले' माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

'नवनीत राणांसह 5 खासदार बनावट जात प्रमाणपत्रावर लोकसभेत निवडून गेले' माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

'नवनीत राणांसह 5 खासदार बनावट जात प्रमाणपत्रावर लोकसभेत निवडून गेले' माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

5 mp elected on forged sc certificates alleges ex cm of Bihar: देशभरातील पाच खासदार हे बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर लोकसभेत दाखल झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्यासह एकूण पाच खासदार हे बनावट जात प्रमाणपत्राच्या (forged sc certificates) आधारावर लोकसभेत निवडून गेल्याचा दावा करण्यात आला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चा पक्षाचे प्रमुख जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी हा दावा केला आहे. या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका केंद्रीय मंत्र्यासह पाच खासदारांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवर बनावट जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडून गेले असल्याचं जीतन राम मांझी यांनी म्हटलं आहे. कुठले आहेत हे पाच खासदार? पक्षाच्या बैठकीत जीतन मांझी यांनी ज्या खासदारांबाबत दावा केला आहे त्यात पाच नावांचा समावेश आहे. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री एसपी बघेल आणि जे शिवाचार्य महास्वामीजी या दोन भाजप खासदारांचा समावेश आहे. तर काँग्रेसचे खासदार मोहम्मद सादिक, महाराष्ट्रातील अपक्ष खासदार नवनीत रवी राणा आणि तृणमूल काँग्रेसच्या अपरुपा पोद्दार यांच्या नावांचा समावेश आहे. जीतन मांझी यांनी केलेल्या या आरोपावर अद्याप या पाचही खासदारांकडून खुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र, असे असले तरी यापैकी अनेक खासदारांनी यापूर्वीही हे आरोप नाकारले आहेत. खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून नवनीत राणा यांना दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाकडून जून महिन्यात या निकालाला स्थगिती दिली आहे. मांझी यांनी दावा केला की, नोकरी आणि स्थानिक निवडणुकांमध्ये दलितांसाठी निश्चित करण्यात आलेल्या कोट्यातील 15 ते 20 टक्के जागा इतरांनी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे मिळवल्या आहेत. हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे प्रमुख मांजी यांनी आपल्या पक्षाच्या सर्व संघटनात्मक संघटना बरखास्त करण्याची घोषणा केली असून लवकरच पुनर्रचना केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. खोटे जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणांना मोठा दिलासा खोटे जात प्रमाणपत्र प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसंच, तक्रारदारांना नोटीसही बजावण्यात आली आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र हे खोटे असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी केला होता. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने हे प्रमाणपत्र रद्द केले होते. या निर्णयाविरोधात नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. उच्च न्यायालयाने राणांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरुन राणा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. काय आहे प्रकरण? नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याबाबत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. सदर दाव्याचा निकाल 8 जून रोजी घोषीत करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने ही घटना घोटाळा आहे, असे मत नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना 2 लाखाचा दंड ठोठावला होता. तसंच सदरचं खोटं जात प्रमाणपत्र 6 आठवड्याच्या आत शासनाला जमा करण्याचे आदेश दिले होते. जातप्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला होता, त्यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. पण, अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    पुढील बातम्या