बॅगेत सापडलं 5 महिन्यांचं बाळ; बापाने सोडली भावुक चिठ्ठी, वाचून तुमचंही ह्रदय पिळवटून निघेल

बॅगेत सापडलं 5 महिन्यांचं बाळ; बापाने सोडली भावुक चिठ्ठी, वाचून तुमचंही ह्रदय पिळवटून निघेल

मनावर दगड ठेवून या बापाने आपल्या पोटच्या पोराला बॅगेत भरून सोडून दिलं

  • Share this:

अमेठी, 5 नोव्हेंबर : एका 5 महिन्याच्या मुलाच्या बापाला आपल्या मुलाला बेवारस सोडून जाण्याची वेळ आली. ही घटना वास्तवाचं भान आणून देते. आपल्या पोटच्या पोराला असं बेवारस सोडून देणं ही मोठी बाब आहे. मात्र समोर आलेल्या परिस्थिती मनावर दगड ठेवून बापाने मुलाला बेवारस सोडून दिलं. सोबत त्याने एक चिठ्ठीही सोडली. त्यामध्ये त्याने जे काही लिहिलंय ते वाचून तुमचे डोळेही पाणावतील.

या बापाने आपल्या पाच महिन्यांच्या मुलाला एका बॅगेत भरलं आणि पैसेही सोबत ठेवले. आणि एक भावुक चिठ्ठीही बाळासोबत ठेवली. चिठ्ठीत लिहिलं होतं की, मी पैसे पाठवत राहिन. काही महिन्यांसाठी माझ्या बाळाला सांभाळा. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातून हे प्रकरण समोर आलं आहे. अमेठी पोलिसांना हे पाच महिन्यांचं बाळ एका झोल्यात सापडलं आहे. मुशीगंज भागात पोलिसांनी हे बाळ सापडलं आहे. बॅगेत बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर पीआरवीनी याबाबत सूचना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाली. यावेळी एका बॅगेत बाळ रडत होतं. पोलिसांनी सांगितले की, बॅगेतून बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर कंट्रोल रुमला याबाबत माहिती देण्यात आली होती. पोलिसांच्या टीमने जेव्हा बॅग उघडून पाहिली तेव्हा बाळासह कपडे, शूज, 5हजार रुपये आदी गरजेच्या वस्तू होत्या. यासोबत एक चिठ्ठीदेखील मिळाली. ही चिठ्ठी बाळाच्या वडिलांनी लिहिल्याची शक्यता आहे.

हे ही वाचा-सरकारी शाळेतले प्रिन्सिपल त्रास देतात म्हणून शिक्षकाने घेतलं पेटवून

माझ्या कुटुंबात बाळाला धोका आहे...आणखी पैसे हवे असतील तर सांगा..

वडिलांनी चिठ्ठीत लिहिलं की, हा माझा मुलगा आहे. याला मी तुमच्याकडे सहा-सात महिन्यांसाठी सोड आहे. आम्ही तुमच्याबद्दल खूप चांगलं ऐकलं आहे. यासाठी माझा मुलगा तुमच्याकडे सोडत आहे. चिठ्ठीत पुढे लिहिलं की, मी 5000 रुपये प्रत्येक महिन्याला पाठवत राहिन. तुम्हाला हात जोडून विनंती आहे की, कृपया माझ्या बाळाला सांभाळा. माझी अडचण आहे. या बाळाला आई नाही. माझ्या कुटुंबात बाळाला धोका आहे. यासाठी 6-7 महिने तुमच्याकडे सोडत आहे. सर्व परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मी बाळाला घेऊन जाईन. तुम्हाला आणखी पैशांची गरज असेल तर कळवा.

Published by: Meenal Gangurde
First published: November 5, 2020, 4:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading