मराठी बातम्या /बातम्या /देश /

शिंदे गटातील 5 मंत्री नाराज? आता 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्' बोला, मेटेंचा मृत्यू की घातपात?

शिंदे गटातील 5 मंत्री नाराज? आता 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्' बोला, मेटेंचा मृत्यू की घातपात?

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 15 ऑगस्ट : एक महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर काल मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. मात्र, यानंतर शिंदे गटातील पाच मंत्री नाराज असल्याची सुत्रांची माहिती आहे. दरम्यान, मंत्री नाराज नसल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. शिवसंग्रामाचे नेते विनायक मेटे यांच्या अपघात की घातपात यावरुन आता चौकशी सुरू आहे. राज्यात शासकीय कार्यालयात आता 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्'ने संभाषणाला सुरुवात होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. विनायक मेटेंचा मृत्यू अपघात का घातपात? पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात मेटे यांचा मृत्यू झाला आहे. एक्सप्रेस हायवेवर ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ट्रक ड्रायव्हर पळून गेला होता, पण आता त्याची ओळख पटल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ज्या ट्रक बरोबर हा अपघात घडला तो ट्रक पालघर जिल्ह्यातील कासा येथील असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. अडीच वर्षांच्या फॉर्म्युलावर फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे जाणार नाही, अडीच वर्षांचा फॉर्म्युला भाजपने (BJP) कधीच सांगितला नव्हता, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री काय म्हणाले मला माहिती नाही, पण त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. अडीच वर्षांचा फॉर्म्युला कधीच नव्हता, असं फडणवीस म्हणाले. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाना पटोलेंची खोचक टीका जून महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर राज्यात शिंदे गट-भाजपचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता राज्य मंत्रिमंडळाचं अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. खातेवाटपानंतर एकनाथ शिंदेंचे 5 मंत्री नाराज एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा (CM Eknath Shinde) शपथविधी झाल्यानंतर अखेर खातेवाटपाचा निर्णयही झाला आहे, पण या खातेवाटपामुळे शिंदे गटातले 5 मंत्री नाराज झाले आहेत. दादा भुसे, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, संजय राठोड आणि संदिपान भुमरे हे पाच मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे दादा भुसे (Dada Bhuse) यांचा फोन स्विच ऑफ येत आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. गुणरत्न सदावर्तेंनी काढला पळ शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं आज अपघाती निधन झालं. मेटे यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. विनायक मेटे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्री होताच पहिला मोठा निर्णय राज्यात शासकीय कार्यालयात आता 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्'ने संभाषणाला सुरुवात होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस इतिहासाच्या पानात कसा नोंदवला गेला? 15 ऑगस्ट 1947 हा भारताच्या इतिहासातील सर्वात सुंदर दिवस आहे. या दिवशी भारताला 200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. खरे तर हेच ते दिवस आहेत जे आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आणि तपश्चर्याची आठवण करून देतात. या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकवला. या दिवशी बरंच काही घडलं होतं, ज्याची इतिहासाच्या पानात नोंद झाली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पहिले भाषण, जे त्यांनी 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्री व्हाईसरॉय लॉज (वर्तमान राष्ट्रपती) भवनातून दिले होते. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. अमेरिका-चीन भिडणार? तैवान वरुन अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीनंतर 12 दिवसांनी अमेरिकन खासदारांचे एक शिष्टमंडळ तैवानला भेट देत आहे. पेलोसी यांच्या भेटीवर चीनने तीव्र आक्षेप घेतला होता. तैवानमधील अमेरिकन संस्थेने सांगितले की, मॅसॅच्युसेट्सचे डेमोक्रॅटिक खासदार एड मार्के यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय शिष्टमंडळ आशियाच्या दौऱ्याचा भाग म्हणून रविवारी आणि सोमवारी तैवानमध्ये आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
First published:

Tags: Eknath Shinde, Vinayak mete

पुढील बातम्या