कोयंबतूर, 12 ऑक्टोबर : निवडणुकीत जिंकून येण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. पण, त्याने कितीही आट्यापिट्या केला तरी मतदारांच्या मतांवरच त्याचे भवित्व्य अवलंबून असते. तामिळनाडूच्या कोयंबत्तूरमध्ये (Coimbatore ) स्थानिक स्वराज्य निवडणुकीत (e rural local body elections) भाजपच्या (bjp) एका उमेदवाराला फक्त एकच मत मिळाले. गंमत म्हणजे, त्याच्या घरात एकूण 5 सदस्य होते. तरीही त्याला एक मत मिळाल्यामुळे हा पठ्ठा चर्चेचा विषय ठरला आहे.
९ ऑक्टोबर रोजी कोयंबत्तूरमध्ये ग्रामीण भागात स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपकडून डी कार्तिक नावाचा उमेदवार उभा होता. त्याने पेरियानाई केनपलायम युनियन कुरुदम्पालयम पंचायत प्रभाग क्रमांक ९ मध्ये वार्ड कौन्सिलरपदासाठी निवडणूक लढवली होती. पण, या निवडणुकीत त्याला एकच मत मिळाले, असं वृत्त द न्यूज मिंटने दिले आहे.
लग्नानंतर फळफळलं कपलचं नशीब! हनीमूनऐवजी केलं फक्त एक काम आणि 7 कोटींचे मालक बनले
गंमत म्हणजे, डी कार्तिक यांच्या घरात एकूण 5 सदस्य होते. त्यामुळे पाच जणांची मत मिळणे साहजिक होते. पण, त्याला एकही मत मिळाले नाही. पण, माझ्या कुटुंबातील सदस्यांचं प्रभाग क्रमांक 4 मध्ये मतदान होतं, त्यामुळे ते मला मतदान करू शकले नाही, अशी माहिती कार्तिक यांनी दिली.
पण, भाजपच्या उमेदवाराला एकच मत मिळाल्यामुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला. विरोधकांनी तर या भाजपच्या उमेदवारीची चांगलीच खिल्ली उडवली. #SingleVoteBJP या हॅशटॅग खाली ट्वीटरवर लोकांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं. तब्बल 12,000 जणांनी ट्वीट करून त्याची खिल्ली उडवली.
BJP Candidate secured 1 vote! Trivia: His family has 5 votes! #ஒத்த_ஓட்டு_பாஜக pic.twitter.com/L5Y22UOsf3
— இசை (@isai_) October 12, 2021
तर, डीएमकेच्या आयटी सेलच्या इसई यांनी ट्वीट करून, 'कोयंबत्तुरमध्ये भाजपच्या उमेदवाराला फक्त 1 मत मिळाले आणि त्याच्या कुटुंबाला 5 मतं मिळाली' अशी खिल्ली उडवली.
दरम्यान, या स्थानिक संस्थेच्या पोटनिवडणुकीत 55,280 लोकांनी मतदान केलं होतं. कुरुदम्पालयम पंचायतीमध्ये द्रमुक उमेदवार अरुल राजने 387 मते मिळवून विजय मिळवला. तर AIADMK च्या वैथीलिंगमला 196 मते मिळाली. या निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारापेक्षा भाजपच्या या एक मत मिळालेल्या उमेदवाराची चर्चा जास्त होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.