Home /News /national /

काश्मीरमध्ये आणखी एका भाजप नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला; 3 दिवसातील दुसऱ्या घटनेनं खळबळ

काश्मीरमध्ये आणखी एका भाजप नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला; 3 दिवसातील दुसऱ्या घटनेनं खळबळ

गुरुवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी राजौरी येथे भाजपचे मंडळ प्रमुख जसवीर सिंह यांच्या घरावर ग्रेनेडने हल्ला (Grenade Attack in Rajouri) केला. या हल्ल्यात 5 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

    श्रीनगर 13 ऑगस्ट : जम्मू -काश्मीरमध्ये लष्कर आणि स्थानिक पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे दहशतवादी भडकले आहेत आणि स्थानिक नेत्यांना सतत लक्ष्य करत आहेत. गुरुवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी राजौरी येथे भाजपचे मंडळ प्रमुख जसवीर सिंह यांच्या घरावर ग्रेनेडने हल्ला (Grenade Attack in Rajouri) केला. या हल्ल्यात 5 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच जम्मू -काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून सर्व बाजूंनी परिसर सील करण्यात आला आहे. दहशतवाद्यांच्या शोधात पोलिसांकडून परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. त्याचबरोबर हल्ल्यात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भाजप नेत्याच्या घरावर हल्ला (Grenade Attack on BJP leader's House) होण्याची ही 3 दिवसातील दुसरी घटना आहे. धक्कादायक! Delta Plus चा मुंबईत पहिला बळी; कोरोना लस घेतल्यानंतरही मृत्यू काही दिवसांपूर्वी जम्मू -काश्मीरच्या अनंतनागमध्ये (Anantnag) एका भाजप नेत्याची आणि त्याच्या पत्नीची हत्या करण्यात आली होती. दक्षिण काश्मीरच्या (South Kashmir) अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात भाजप नेता आणि त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दोघांचाही मृत्यू झाला. शहरातील लाल चौकात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. गेल्या काही वर्षांत भाजप नेत्यांवरील हल्ले सातत्याने वाढत आहेत. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं ठोठावला दरवाजा? एका आठवड्यात 300 मुलं Positive दहशतवाद्यांनी कुलगाम भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष गुलाम रसूल डार (Gulam Rasool Dar) यांनाही लक्ष्य केलं. पक्षाच्या नेत्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. गुलाम रसूल डार हे भाजपचे पदाधिकारी असण्याबरोबरच सरपंचही होते. काही दिवसांपूर्वी पंचायत निवडणुकीत ते निवडून आले होते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: BJP, Jammu and kashmir, Terrorist attack

    पुढील बातम्या