मराठी बातम्या /बातम्या /देश /

अंत्यसंस्कारासाठी जातानाच मृत्यूचं तांडव, भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू

अंत्यसंस्कारासाठी जातानाच मृत्यूचं तांडव, भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू

अंत्यसंस्कारासाठी (funeral) जात असताना चालकाचं कारवरचं नियंत्रण (control on car) सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात (car accident) एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू (5 dead) झाला.

  • Published by:  desk news

लखनऊ, 12 ऑगस्ट :अंत्यसंस्कारासाठी (funeral) जात असताना चालकाचं कारवरचं नियंत्रण (control on car) सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात (car accident) एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू (5 dead) झाला. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बस्तीमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातात कारच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या. एनएच-28 वर एका हॉटेलपाशी उभ्या असणाऱ्या कंटेनरला या कारने मागून जोरदार धडक दिली आणि कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन मुली आणि त्यांचे आईवडिल यांचा मृत्यू झाला. तर आणखी एक मुलगी आणि कारचा ड्रायव्हर या अपघातातून बचावले आहेत.

अशी घडली दुर्घटना

अब्दुल अजीज, त्यांची पत्नी आणि चार मुली हे मूळचं बिहारी कुटुंब सध्या कामानिमित्त उत्तर प्रदेशातील शारदा नगर भागात राहत होतं. अब्दुल अजीज यांच्या सासूबाईंचं निधन झाल्याचं समजल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी हे कुटुंब कारमधून झारखंडला चाललं होत. या कारमध्ये या कुटुंबातील सहाजण आणि ड्रायव्हर असे एकूण 7 जण होते. सकाळच्या सुमाराला झालेल्या भीषण अपघातात अनम (वय 13 वर्षं) आणि कारचा ड्रायव्हर हे बचावले आहेत. तर अब्दुल अजीज (50), नर्गिस तवस्सुम (48), अनम (13), तिउरा (10) आणि सुबा (6) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे, अशी बातमी 'दैनिक भास्कर'ने दिली आहे.

हे वाचा -भाजप युवा मोर्चाच्या माजी शहराध्यक्षावर गोळीबार, घटनेचा धक्कादायक CCTV

भीषण धडक

ही धडक इतकी भीषण होती, की गॅस कटरचा वापर करून या सर्वांचे मृतदेह बाहेर काढावे लागले. बचावलेल्या दोघांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून सर्व ती मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. एका अंत्यसंस्कारासाठी जात असतानाच या सर्वांवर काळानं घाला घातल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

First published:

Tags: Accident, Major accident, Uttar pardesh