ऑपरेशन 'ऑल आऊट' यशस्वी, 5 दहशतवाद्यांचा खात्मा

ऑपरेशन 'ऑल आऊट' यशस्वी, 5 दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरच्या शोपियां परिसरात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे.

  • Share this:

07 मे : काश्मीरच्या शोपियां परिसरात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सद्दाम पाडरचाही समावेश आहे. तसंच पेशानं प्राध्यापक असलेला डॉक्टर मुहम्मद रफी भट नावाचा दहशतवादीही या चकमकीत ठार झाला आहे. या चकमकीदरम्यान बुरहान वानीची टोळी संपुष्टात आल्याची महत्त्वाची माहिती समोर येतेय.

शोपियांमधील बडीगाम क्षेत्रात सकाळी भारतीय जवानांकडून शोधमोहिम सुरू असतानाच सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीला सुरूवात झाली. या चकमकीत एक पोलीस अधिकारी आणि एक जवान जखमी झाल्याचंही वृत्त आहे.

चकमक सुरू झाल्यानंतर दहशतवाद्यांना जवानांनी शरणागती पत्करण्यास सांगितले होते. मात्र त्यांच्याकडून गोळीबार सुरूच राहिल्याने सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर देत ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान आतापर्यंत सुरक्षा यंत्रणांनी 59 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2018 08:07 AM IST

ताज्या बातम्या