Home /News /national /

करून दाखवलं! देशातील 55% रुग्ण झाले निरोगी, तर 24 तासांत नवीन रुग्णांचा आकडा 15 हजारांच्या घरात

करून दाखवलं! देशातील 55% रुग्ण झाले निरोगी, तर 24 तासांत नवीन रुग्णांचा आकडा 15 हजारांच्या घरात

गेल्या 24 तासांत तब्बल 14 हजार 821 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या 4 लाख 25 हजार 282 झाली आहे.

    नवी दिल्ली, 22 जून : देशात कोरोनाचा (Coronavirus in India) कहर थांबता थांबत नाही आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 14 हजार 821 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या 4 लाख 25 हजार 282 झाली आहे. सध्या देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 1 लाख 74 हजार 387 झाली आहे. तर, 2 लाख 37 हजार 196 रुग्ण निरोगी झाले आहे. मृतांची एकूण संख्या 13 हजार 699 झाली आहे. आनंददायी बातमी म्हणजे सर्वात जास्त लोकं निरोगी झाली आहेत. देशात आतापर्यंत 68 लाखांहून अधिक लोकांची चाचणी झाली असून आतापर्यंत 55.80% लोकं निरोगी झाली आहेत. अरुणाचल प्रदेश, गुजरात, हरियाणा, लडाख, त्रिपूरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल येथे निरोगी रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. तर महाराष्ट्रातील निरोगी रुग्णांचा दर 50% च्या खाली आला आहे, सध्या हा दर 49.8% आहे. राज्यांची आकडेवारी गोवामध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू गोवा राज्यात कोरोनाव्हायरसमुळं पहिला मृत्यू झाला आहे. 85 वर्षीय महिलेला कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तिचा मृत्यू झाला. दरम्यान गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी लोकांनी काळजी घेऊन, सरकारवर विश्वास ठेवावा, असेही सांगितले. 2.37 लाख लोक झाले ठीक सलग दुसऱ्या आठवड्यात देशात 15 हजारहून अधिक रुग्ण सापडले आहेत. मात्र देशाला निरोगी रुग्णांचा आकडाही वाढत आहे. यामुळं काही प्रमाणात चिंता मिटली आहे. देशात सध्या 2 लाख 37 हजार 196 रुग्ण निरोगी झाले आहेत. संपादन-प्रियांका गावडे.
    First published:

    पुढील बातम्या