केरळमध्ये 400 सीआरपीएफ जवानांना अन्नातून विषबाधा

रळमधील थिरुवनंतपुरममध्ये तब्बल 400 सीआरपीएफ जवानांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 2, 2017 02:14 PM IST

केरळमध्ये 400 सीआरपीएफ जवानांना अन्नातून विषबाधा

02 एप्रिल : केरळमधील थिरुवनंतपुरममध्ये तब्बल 400 सीआरपीएफ जवानांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे या जवानांना उपचारासाठी तात्काळ हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलं आहेत.

थिरुवनंतपुरममधल्या पल्लीपुरम इथल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर काल (शनिवारी) रात्री उशिरा हा प्रकार घडला.

अन्नातून विषबाधा खाल्ल्यानंतर काही वेळातच या जवानांना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना जवळच्या हाॅस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.

या घटनेची माहिती मिळताच केरळचे आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी शनिवारी रात्री रुग्णालयात उपचार घेत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांची भेट घेतली. अन्नातून विषबाधा झालेल्या जवानांपैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचं मंगलपुरम पोलिसांनी म्हटलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2017 02:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...