खळबळजनक! सरकारी रुग्णालयात मर्डर, ICUमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचीच भोसकून केली हत्या

आयसीयूमधील वॉर्ड क्रमांक 101 मध्ये ही घटना घडली. हत्या केल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले. या खळबळजनक घटनेमुळे रुग्णालयात भीतीचे वातावरण पसरलं आहे.

आयसीयूमधील वॉर्ड क्रमांक 101 मध्ये ही घटना घडली. हत्या केल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले. या खळबळजनक घटनेमुळे रुग्णालयात भीतीचे वातावरण पसरलं आहे.

  • Share this:
    मदुराई, 08 जून : एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मदुराई इथं रुग्णालयातच प्रवेश करून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. हत्या करण्यात आलेली व्यक्ती 40 वर्षीय असून व्ही. मुरुगन असं नाव आहे. किडनी स्टोनवरील उपचारांसाठी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण गॅंगवॉर संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मदुराई येथील राजाजी सरकारी रुग्णालयात 4 अज्ञात लोक घुसले. येथे उपचार घेत असलेल्या मुरुगन यांच्यावर हल्लेखोरांनी धारेधार शस्त्रांनी हल्ला केला. आयसीयूमधील वॉर्ड क्रमांक 101 मध्ये ही घटना घडली. हत्या केल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले. या खळबळजनक घटनेमुळे रुग्णालयात भीतीचे वातावरण पसरलं आहे. वाचा-भयंकर! मेडिकलला लागलेल्या आगीत डॉक्टरचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी वाचा-धरणाजवळील ओव्हर ब्रिजची भिंत कोसळली, 2 जणांचा दबून मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद खुनाची माहिती मिळताच डीसीपी (कायदा व सुव्यवस्था) ई. कार्तिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ज्या वॉर्डात ही घटना घडली आहे तेथील 10 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. राजाजी हॉस्पिटल हे मदुराईमधील सर्वात मोठं रुग्णालय मानलं जातं. इथं 2500 पेक्षा जास्त बेड्स आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुरुगन स्वतः एका आरोपी आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये राजशेखरन नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता. करुबलाई येथे राहणारा चंदू नावाचा व्यक्ती हा खुनाचा मुख्य आरोपी होता, ज्याच्या घरीही बॉम्बने हल्ला केला आहे. मुरुगन हत्येप्रकरणी राजशेखरन यांच्या पत्नीची भूमिका संशयास्पद असल्याचे पोलीस चौकशीत समोर आलं आहे. वाचा-मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या लोकांची पावलं थांबली, समोर होता रक्ताने माखलेला...  
    First published: