मराठी बातम्या /बातम्या /देश /

सुरक्षा दलाची मोठी कारवाई; काश्मीरमधील अभिनेत्रीची हत्या करणाऱ्या चारही दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलाची मोठी कारवाई; काश्मीरमधील अभिनेत्रीची हत्या करणाऱ्या चारही दहशतवाद्यांचा खात्मा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

गुरुवारी उशिरा झालेल्या चकमकीत टीव्ही अभिनेत्री अमरीन भट्टची हत्या करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांसह सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना ठार केलं.

  • Published by:  Kiran Pharate

श्रीनगर, 27 मे : काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चदूरा गावात दहशतवाद्यांनी 25 मे रोजी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात प्रसिद्धी टीव्ही मालिका स्टार अमरीन भट्ट जखमी झाली होती. अमरीन ही सोशल मीडियावरही प्रचंड प्रसिद्ध आहे. सुरुवातीला तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. पण नंतर तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली (TV Artist Amreen Bhat Shot Dead By Terrorists). यानंतर आता गुरुवारी उशिरा झालेल्या चकमकीत टीव्ही अभिनेत्री अमरीन भट्टची हत्या करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांसह सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना ठार केलं.

BREAKING : काश्मीरच्या सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या घरावर दहशतवाद्यांचा गोळीबार, अमरीन भटचा खून

अवंतीपोरा आणि श्रीनगरमध्ये झालेल्या दोन्ही चकमकीत दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्याबरोबरच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आता त्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या स्लीपर सेलचा शोध घेत आहेत. काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी सांगितलं की, गुप्तचराकडून माहिती मिळाल्यानंतर अवंतीपोरा येथील अगनहंजीपोरा भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली. घरोघरी शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर दोन्ही बाजूंनी चकमक सुरू झाली. काही वेळानंतर सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.

त्यांनी सांगितलं की, शादी मुश्ताक भट रा. बडगाम आणि फरहान हबीब रा. पुलवामा अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. दोन्ही दहशतवादी अलीकडेच लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाले होते. त्यांनीच बुधवारी लष्कर कमांडर लतीफच्या सांगण्यावरून टीव्ही अभिनेत्री अमरीन भट्टची गोळ्या घालून हत्या केली होती. दोघांकडे एक एके-५६ रायफल, एक पिस्तूल आणि चार लोडेड मॅगझिन सापडले आहेत. त्याचवेळी श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे आणखी दोन दहशतवादी मारले गेले.

पंतप्रधान मोदींच्या बॉडीगार्डकडे असलेल्या काळ्या ब्रिफकेसमध्ये काय असतं? जाणून घ्या

आजकाल सुरक्षा दलांच्या सततच्या यशस्वी ऑपरेशन्समुळे दहशतवादी संघटनांचं कंबरडं मोडलं आहे. रागाच्या भरात ते काश्मीरमधील निरपराध नागरिकांना लक्ष्य करत आहेत. काश्मीरमधील जनताही दहशतवाद्यांच्या कारवायांना कंटाळली असून ते त्यांच्या हालचालींची अचूक माहिती सुरक्षा दलांना देत आहेत. त्यामुळे आता सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचा माग काढणं आणि त्यांचा खात्मा करणं सोपं झालं आहे. गेल्या 3 दिवसात सुरक्षा दलांनी आतापर्यंत 10 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यातील 3 दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे आणि 7 दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे होते.

First published:

Tags: Jammu kashmir, Terrorist, Terrorist attack