हंदवाडामध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मेजरसह 4 जवान शहीद

हंदवाडामध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मेजरसह 4 जवान शहीद

हंदवाडामध्ये मागील 72 तासापासून दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरू असून यामध्ये 4 जवान शहीद झाले आहेत.

  • Share this:

हंदवाडा, 3 मार्च : जम्मू - काश्मीरमधील हंदवाडामध्ये मागील 72 तासापासून सीआरपीएफ आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून जम्मू काश्मीरच्या 2 पोलिसांसह सीआरपीएफचे 2 जवान शहीद झाले आहेत. तर, 4 स्थानिक लोक देखील जखमी झाले आहेत. एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. बाबागुंडमध्ये लष्करानं पोलिसांच्या मदतीनं सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर फायरींग सुरू केली. यामध्ये 9 जवान जखमी झाले आहेत. तर, 4 जवान शहीद झाले आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर देखील दहशतवाद्यांची घुसखोरी सुरूच आहे. त्यांचा खात्मा करण्यासाठी लष्करानं सर्च ऑपरेशन देखील सुरू केलं आहे. यापूर्वी शुक्रवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा लष्करानं केला होता. दरम्यान, पाकिस्तानकडून देखील सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. पाकच्या या आगळीकीला लष्कराकडून देखील चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे.

मागील आठवड्यामध्ये पाकिस्ताननं 60 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.

दहशतवाद्यांवर एअर स्ट्राईक

पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक करत 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला. सध्या दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. दरम्यान, पाकिस्ताननं विंग कमांडर अभिनंदन यांना सोडत भारताकडे चर्चेसाठी हात पुढे केला आहे. पण, भारतानं मात्र दहशतवाद्यांना साथ देणं थांबवा, त्यांना रोखा त्यानंतरच चर्चा असा पवित्रा घेतला आहे.

भारताच्या एअर स्ट्राईकचा पुरावा

भारताच्या एअर स्ट्राईकचा काहीही फायदा झाला नाही.आम्ही त्यांना पळवून लावलं, अशा वल्गना करणारा पाकिस्तान आता चांगलाच तोंडावर आपटला आहे. कारण, भारताच्या कारवाईमध्ये जैश ए मोहम्मदचा कॅम्प उद्धवस्त झाल्याची कबुली मसूद अझहरचा भाऊ मोहम्मद अम्मारनं दिली आहे. मोहम्मदची ही कबुली म्हणजे भारतानं केलेली कारवाई यशस्वी झाल्याचा पुरावाच आहे. एअर स्ट्राईकमध्ये भारतानं 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली होती. पाकिस्ताननं मात्र यामध्ये काहीच नुकसान झालं नाही असं म्हटलं होतं.

उदयनराजेंनी कुणाला म्हटलं, 'I Love You So Much'? पाहा व्हिडिओ

First published: March 3, 2019, 9:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading