पोर्ट ब्लेअर, 03 ऑगस्ट: केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटावरील (Andaman and Nicobar Island) पोर्टब्लेअर (Portblair) येथे मंगळवारी सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं याबाबतची माहिती दिली आहे. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. सुदैवाची बाब म्हणजे, या भूकंपाच्या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. असं असलं तरी गेल्या फेब्रुवारी महिन्यात देखील पोर्ट ब्लेअरमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले होते.
यापूर्वी 15 फेब्रुवारीला याच भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी पोर्ट ब्लेअरजवळ 4.1 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपाच केंद्रबिंदू पोर्ट ब्लेअर शहरापासून दक्षिण-आग्नेयकडे 258 किमी अंतरावर आहे. याव्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या काळात बिकानेरमध्ये 5.3 तीव्रतेचा तर हैदराबादमध्ये 4.0 तीव्रतेचा भूकंप झाला होता.
हेही वाचा-REAL HERO: वादळी वाऱ्यात समुद्रात अडकलेल्या अनोळखी व्यक्तीसाठी तरुणाने घेतली झेप
पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत माहिती दिली होती की, देशाच्या भूकंपाच्या नकाशानुसार देशाची एकूण चार भागात विभागणी करण्यात आली आहे. यातील झोन 5 हा भूकंपाच्या दृष्टीनं सर्वाधिक सक्रिय भाग आहे. तर, झोन 2 मध्ये सर्वात कमी भूकंपाचा धोका आहे. मीडिया वृत्तानुसार, देशातील 11 टक्के भाग हा झोन 5 मध्ये येतो. तर झोन 4 मध्ये 18 टक्के, झोन 3 मध्ये 30 टक्के आणि उर्वरित क्षेत्र झोन 2 मध्ये येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Earthquake