S M L

कोची शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू, 13 जखमी

केरळच्या कोची शिपयार्ड इथे दुरूस्तीसाठी आलेल्या ओएनजीसीच्या ‘सागर भूषण’ जहाजावर झालेल्या स्फोटामुळे चार कामगार ठार तर १३ जण जखमी झाले.

Sonali Deshpande | Updated On: Feb 13, 2018 01:00 PM IST

कोची शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू, 13 जखमी

13 फेब्रुवारी : केरळच्या कोची शिपयार्ड इथे दुरूस्तीसाठी आलेल्या ओएनजीसीच्या ‘सागर भूषण’ जहाजावर झालेल्या स्फोटामुळे चार कामगार ठार तर १३ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू आहे.

स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. ओएनजीसीचे हे जहाज दुरूस्तीसाठी कोची शिपयार्ड येथे आले होते. जहाजावरील पाण्याच्या टाकीत हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. अजूनही दोन कामगार त्या टाकीत असल्याचे समजते. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून गेवीन आणि रामशाद अशी त्यांची नावे आहेत. महाशिवरात्री असल्यामुळे कोची शिपयार्ड आज बंद आहे. पण दुरूस्तीच्या कामासाठी काही विभाग सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2018 01:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close