मराठी बातम्या /बातम्या /देश /

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जम्मू-काश्मीरचे ४ पोलीस जवान शहीद

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जम्मू-काश्मीरचे ४ पोलीस जवान शहीद

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रातिनिधिक छायाचित्र

सकाळी भारतीय जवानांकडून २ कुख्यात दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीर, ३० ऑगस्ट- जम्मू काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात अरमाहा गावात पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४ पोलीस शहीद झाले. हल्ल्यानंतर पोलिसांकडील शस्त्र हिसकावून दहशतवादी फरार झाले. भारतीय लष्कराने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान बुधवारी सकाळी अनंतनाग इथे सुरक्षा रक्षकांनी हिजबुल संघटनेच्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. हिजबुल संघटनेचा अल्ताफ अहमद डार उर्फ अल्ताफ कचरू आणि त्याचा साक्षीदार उमर राशिद या दहशतवाद्यांना ठार केलं. या दहशतवाद्यांच्या मृत्यूनंतर दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला.

VIDEO : नवीन महाराष्ट्र सदनात आमचाच बळी गेला - भुजबळ

First published:

Tags: Shopian, Terror attack, Terror attack in india, Terror attack in kashmir