S M L

अण्णांशी पुन्हा सरकारची चर्चा होणार,गिरीश महाजन रामलीला मैदानावर जाण्याची शक्यता

अण्णांच्या आंदोलनाला यावेळी पूर्वीच्या आंदोलनापेक्षा खूपच कमी गर्दी पहायला मिळतेय.उपोषणामुळे अण्णांचं वजन 2 किलोनं घटलंय.

Sonali Deshpande | Updated On: Mar 25, 2018 03:40 PM IST

अण्णांशी पुन्हा सरकारची चर्चा होणार,गिरीश महाजन रामलीला मैदानावर जाण्याची शक्यता

25 मार्च : अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दिल्लीत गेलेत. अण्णा हजारे यांच्याशी पुन्हा सरकारची चर्चा होणार आहे.  गिरीश महाजन रामलीला मैदानावर जाण्याची शक्यता आहे.

जनलोकपाल आणि सोबतच इतर मागण्यांसह अण्णांनी 23 मार्चपासून आंदोलनाची सुरूवात केली.  दरम्यान अण्णांच्या आंदोलनाला यावेळी पूर्वीच्या आंदोलनापेक्षा खूपच कमी गर्दी पहायला मिळतेय.उपोषणामुळे अण्णांचं वजन 2 किलोनं घटलंय.

आता आज रविवार असल्यामुळे अण्णांच्या आंदोलनाला आज तरी गर्दी होणार का, हा मोठा प्रश्न आहे. तर केंद्र सरकारकडून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील, असे हजारे यांनी आंदोलनाला बसण्याआधीच स्पष्ट केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2018 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close