या हॉस्पिटलमध्ये 36 नर्सेस एकाच वेळी झाल्या प्रेग्नंट!

या हॉस्पिटलमध्ये 36 नर्सेस एकाच वेळी झाल्या प्रेग्नंट!

या हॉस्पिटलने आपल्या फेसबुक पेजवर नर्सेसचा एक ग्रुप फोटो शेअर केला आहे. याच हॉस्पिटलची एक नर्स एलिसन रोन्कोने या पोस्टसोबत एक मजेशीर वाक्य लिहिलं आहे. इथले पेशंट्स गंमतीने म्हणतात, तुम्हाला प्रेग्नंट राहायचं असेल तरच इथलं पाणी प्या!

  • Share this:

मिसुरी, 3 ऑगस्ट : अमेरिकेतल्या एका हॉस्पिटलमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आलाय. इथल्या एका चाइल्ड केअर हॉस्पिटलमध्ये 36 नर्सेस एकाच वेळी प्रेग्नंट राहिल्या. मिसुरीच्या चिल्ड्रन मर्सी कॅनसस सिटी हॉस्पिटलमधला हा प्रकार आहे. या हॉस्पिटलमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिटच्या 36 नर्सेस एकाच वेळी गर्भवती राहिल्या. आतापर्यंत 20 नर्सेसची डिलिव्हरी झालीय आणि या वर्षीच्या अखेरपर्यंत आणखी नर्सेसची डिलिव्हरी होणार आहे.

या हॉस्पिटलने आपल्या फेसबुक पेजवर नर्सेसचा एक ग्रुप फोटो शेअर केला आहे. त्यात म्हटलं आहे, आमच्या इंटेन्सिव्ह केअर नर्सरीमधल्या नर्सेसनी गर्भवती असतानाही इथल्या रुग्णांची दिवसरात्र सेवा केली.

#MumbaiRains LIVE : पावसाचा धूमाकूळ, हवामान खात्यानं दिला 'हा' इशारा!

हा फोटो जूनमध्ये काढला होता. या हॉस्पिटलमध्ये नर्सेसना होणाऱ्या मुलांपैकी फक्त दोनच मुली आहेत. बाकीच्या नर्सेसना मुलंच झाली.

'गुड मॉर्निंग अमेरिका' च्या रिपोर्टनुसार, याच हॉस्पिटलची एक नर्स एलिसन रोन्कोने या पोस्टसोबत एक मजेशीर वाक्य लिहिलं आहे. इथले पेशंट्स गंमतीने म्हणतात, तुम्हाला प्रेग्नंट राहायचं असेल तरच इथलं पाणी प्या! एलिसन रोन्कोने 7 जानेवारी 2019 ला एका मुलाला जन्म दिला.

============================================================================================

VIDEO : मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत; पाहा महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2019 07:16 PM IST

ताज्या बातम्या