मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारतात 2020 मध्ये खड्ड्यांनी घेतले 3500 बळी; अपघातांसाठी कारणीभूत ठरल्या या गोष्टी

भारतात 2020 मध्ये खड्ड्यांनी घेतले 3500 बळी; अपघातांसाठी कारणीभूत ठरल्या या गोष्टी

 2020 मध्ये खड्ड्यांमुळे देशात एकूण 3,564 रस्ते अपघात झाले. 2020 मधील अपघातांची ही आकडेवारी मागील पाच वर्षातील सर्वात कमी संख्या आहे.

2020 मध्ये खड्ड्यांमुळे देशात एकूण 3,564 रस्ते अपघात झाले. 2020 मधील अपघातांची ही आकडेवारी मागील पाच वर्षातील सर्वात कमी संख्या आहे.

2020 मध्ये खड्ड्यांमुळे देशात एकूण 3,564 रस्ते अपघात झाले. 2020 मधील अपघातांची ही आकडेवारी मागील पाच वर्षातील सर्वात कमी संख्या आहे.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : भारतात रस्ते अपघातात (Road Accident) सर्वाधिक मृत्यू होतात. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 2020 मध्ये रस्ते अपघाताबाबतची आकडेवारी सांगितली. 2020 मध्ये खड्ड्यांमुळे देशात एकूण 3,564 रस्ते अपघात झाले. 2020 मधील अपघातांची ही आकडेवारी मागील पाच वर्षातील सर्वात कमी संख्या आहे. 2016 मध्ये केवळ खड्ड्यांमुळे 6424 अपघात झाले. 2017 मध्ये 9423, 2018 रोजी 4869 आणि 2019 मध्ये खड्ड्यांमुळे 4775 अपघात झाल्याची आकडेवारी केंद्रीय मंत्र्यांनी दिली. 2019 मध्ये एकूण अपघातांची संख्या 4 टक्क्यांनी कमी होऊन ती 4,49,002 झाली. यात ओव्हरस्पीडिंगमुळे 3,19,028 अपघात, दारु पिऊन गाडी चालवण्यामुळे 12,256 अपघात झाले. तर गाडी चालवताना फोनच्या वापरामुळे 24,431 दुर्घटना झाल्या. अपघातांच्या कारणांबाबत बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं, की ऑटोमोबाईल डिझाईन, अधिक वेग, मोबाईल फोनचा वापर, ड्रिंक अँड ड्राईव्ह, वाहन ओव्हरलोड, वाहनांची खराब स्थिती आणि योग्य प्रकारे प्रकाश नसणं अशी अपघातांची कारणं असू शकतात.

सर्वसामान्यांसाठी फायद्याची ठरेल Scrappage Policy, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले 2 मोठे फायदे

त्याशिवाय सिग्नल क्रॉस करणं, ओव्हरटेक करणं, खराब हवामान, चुकीच्या दिशेने गाडी चालवणं, रस्त्यांची खराब स्थिती, पायी चालणाऱ्या लोकांची चूक, वाहन चालकाची चूक अशा अनेक गोष्टी अपघातांसाठी कारणीभूत ठरू शकतात.

OLA e-scooter: या 4 चार राज्यात स्वस्तात मिळणार स्कूटर, पाहा किती कमी होईल किंमत

गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्या मंत्रालयाने शिक्षण, रस्ते आणि गाड्यांचं इंजिनिअरिंग आणि आपत्कालीन देखभाल या चार घटकांवर आधारित रस्ता सुरक्षेच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी धोरण तयार केलं आहे. नियोजनानुसार, रस्ता सुरक्षा हा रस्ते डिझाईनचा एक अविभाज्य भाग असल्याचं गडकरी म्हणाले. तसंच राष्ट्रीय महामार्गांवर ब्लॅक स्पॉट किंवा अपघात प्रवण स्थळ ओळखणं, तसंच त्यात सुधारणा करणं याला प्राधान्य दिलं आहे. तसंच सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी वाहनांची रचना आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांशी जुळण्याबाबतही सूचना त्यांनी दिल्या आहेत.
First published:

Tags: Accident, Road accident

पुढील बातम्या