35 वर्षीय कोरोना योद्धा महिलेचा ड्यूटीदरम्यान मृत्यू; त्यागाला मुख्यमंत्र्यांचा सलाम

35 वर्षीय कोरोना योद्धा महिलेचा ड्यूटीदरम्यान मृत्यू; त्यागाला मुख्यमंत्र्यांचा सलाम

या महिला अधिकारीला ड्यूटीदरम्यान कोरोनाची लागण झाली होती

  • Share this:

कलकत्ता, 13 जुलै : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. अशा परिस्थिती पोलीस दलापासून विविध क्षेत्रात कोरोना योद्ध्याचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे.

पश्चिम बंगालमध्येही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 35 वर्षीय WBCS महिला अधिकारी देवदत्ता रॉय यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ड्यूटीदरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांंनी अधिकारीच्या पतीला पत्र लिहिले आहे.

देवदत्ता या हुगली जिल्ह्यात  एसडीओ पदावर तैनात होत्या. ड्यूटीदरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

ममता बॅनर्जी यांनी देवदत्ता यांच्या त्यागाला सॅल्युट केला आहे. त्यांनी देवदत्ता यांच्या पतीशी संवाद साधला आणि त्यांना आधार दिला.

Published by: Meenal Gangurde
First published: July 13, 2020, 8:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading