जमिनीखाली आढळलं तब्बल 3000 टन सोन्याचं घबाड

जमिनीखाली आढळलं तब्बल 3000 टन सोन्याचं घबाड

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्हात जमिनीत तब्बल 3 हजार टन सोनं आढळलं आहे. राज्य सरकार लवकरच हे सोन काढण्याला सुरूवात करणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : सोनं हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी किती महत्त्वपूर्ण आहे याचा अंदाज आपल्या सर्वांना आहे. देशाकडील सोन्याच्या साठ्याचा अर्थव्यवस्थेला मोठा आधार असतो. मात्र भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. जमिनीखालच्या 3 हजार टन सोन्याचा शोध जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला (GSI ) लागला आहे. लवकरच हे सोनं काढण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे. जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची टीम 15 वर्षांपासून या भागामध्ये काम करत होती. 8 वर्षांपूर्वी या टीमने इथं सोनं असल्याच्या माहितीला पुष्टी दिली होती. आता हे सोनं देशातील कोणत्या भागामध्ये आढळलं आहे हे जाणून घ्यायची सर्वांच्या मनामध्ये उत्सुकता असेल.

हे सोनं सापडलं आहे उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) सोनभद्र (Sonbhadra) जिल्ह्यात. उत्तर प्रदेश सरकारने आता हे सोनं जमिनीबाहेर कामात वेग घेतला आहे आणि हे सोनं विकण्यासाठी ई-लिलाव प्रक्रियेला सुरूवात केली आहे.

गावाशेजारी डोंगरांवर मिळालं सोन्याचं घबाड

जीएसआयची टीम 2005 सालापासून सोन्याच्या शोधासाठी काम करत होती. टीमने सोनभद्र भागातील केलेला अभ्यास आणि संशोधनानंतर तिथं सोनं असल्याची माहिती दिली होती. आणि 2012 मध्ये त्यांनी या माहितीला पुष्टी दिली होती. GSI ने दिलेल्या माहितीनुसार हरदी भागामध्ये 646.15 किलो तर सोनं पहाडीमध्ये 2943.25 टन सोन्याचा साठा आहे. उत्तर प्रदेश सरकारने या सोनं असलेल्या भूभागाच्या वाटपासंदर्भातील प्रकिया वेगात सुरू केली आहे. ई-टेंडरिंगच्या माध्यमातून या ब्लॉकचे लिलाव केले जाणार आहेत. यासाठी सरकारने सात सदस्यांची समितीही स्थापन केली आहे. या संपूर्ण क्षेत्राची जिओ टॅगिंग केली जाणार आहे आणि त्याचा रिपोर्ट भूगर्भ आणि खाणकाम संचलनालय लखनऊ यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.

अन्य बातम्या

VIDEO '15 कोटी आहोत पण 100 कोटींवर भारी आहोत', वारिस पठाण यांची चिथावणी

'नाणार'वरून शिवसेनेत दुफळी, 22 शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

First published: February 20, 2020, 6:53 PM IST

ताज्या बातम्या