हिसार (हरियाणा), 12 ऑक्टोबर : हरियाणामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. येथील त्रिवेणी विहार कॉलनीमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय तरूणाने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या केली. या तरुणाने लाइव्ह करत पंख्याला लटकून आत्महत्या केली. नातेवाईकांनी यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली.
कुटुंबियांनी पोलिसांनी याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. याबाबत माहिती देताना तपास अधिकारी एएसआय सतपाल सिंह म्हणाले की, उकलानाच्या त्रिवेणी बिहार येथील 30 वर्षीय पवननं फेसबुक लाइव्ह करून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला. दरम्यान, तपास अधिकारी सतपाल यांनी सांगितले की, मृत पवनचा चुलत भाऊ चंद्रमोहन याच्या तक्रारीवरून 4 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
वाचा-तुरीच्या पिकासोबत शेतकऱ्याने केली कमाल, पोलीसही झाले हैराणवाचा-...म्हणून मुंबई पोलीस आहे ग्रेट, 1500 किमी पाठलाग करून आरोपीला ठोकल्या बेड्या!
पवनच्या चुलत भावानं दिलेल्या माहितीनुसार, पवन ट्रक ट्रेलर चालवत होता. पवन एका कंपनीच्या ट्रकमध्ये गाडी चालवत असे आणि त्याला काही दिवसांपासून मानसिक त्रास देत होता. कंपनीने कित्येक महिन्यांपासून पगार न दिल्याने पवन अस्वस्थ होता. या मानसिक त्रासामुळे पवननं गळफास लावून आत्महत्या केली, असे चंद्रमोहन यांनी सांगितले. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.