Home /News /national /

शस्त्रक्रियेसाठी हसत आत गेला पण बाहेर आलाच नाही; खेळण्यातील चुंबक गिळलेल्या 3 वर्षीय मुलाचा मृत्यू

शस्त्रक्रियेसाठी हसत आत गेला पण बाहेर आलाच नाही; खेळण्यातील चुंबक गिळलेल्या 3 वर्षीय मुलाचा मृत्यू

अॅनेस्थेशियाचा अतिरेक (Anaesthesia) आणि हलगर्जीपणा यामुळे कबीरचा मृत्यू झाल्याचा आरोप करत तिवारी कुटुंबाने रुग्णालयात गोंधळ घातला. त्यांनी रुग्णालयाविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

भोपाळ 10 ऑगस्ट : अनेकदा आपण ऐकतो की लहान मुलानं नाणं गिळलं किंवा अन्य काहीतरी वस्तू गिळली आणि ती घशात अडकल्यानं शस्त्रक्रिया करून काढण्याची वेळ आली. यात मृत्यू झाल्याचं क्वचितच आढळलं आहे. पण मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमधील (Indore) कबीर तिवारी (Kabir Tiwari) या तीन वर्षांच्या मुलाचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला आहे. यासाठी डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत तिवारी कुटुंबीयांनी रूग्णालयाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दैनिक भास्करनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. इंदूरमधील सुनील तिवारी यांचा कबीर हा एकुलता एक मुलगा होता. तीन वर्षांच्या कबीरनं 29 जुलै रोजी चुंबक गिळल्यानं (swallowed magnet ) त्याला तातडीनं गुमस्ता नगर येथील अरिहंत रुग्णालयात (Arihant Hospital) आणण्यात आलं होतं, मात्र तेव्हा त्याला सर्दी असल्यानं लगेच शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. 12 दिवसांनी 9 ऑगस्ट रोजी त्याच्यावर एंडोस्कोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी आठ वाजता ही शस्त्रक्रिया सुरू झाली. साधारण तासभर चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या घशात अडकलेले चुंबक काढण्यात आलं आणि कबीरला एनआयसीयूमध्ये (NICU) हलवण्यात आलं. उष्टा ग्लास माठात बुडवला म्हणून 8 वर्षांच्या मुलाला जमिनीवर आपटून मारले शस्त्रक्रियेनंतर अर्ध्या तासात कबीर शुद्धीवर येईल असं डॉक्टरांनी सांगितलं, मात्र अर्ध्या तासानंतरही कबीर शुद्धीवर आला नाही. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्याला शुद्धीवर येण्यासाठी आणखी तीन ते चार तास लागतील. त्यानंतर अर्ध्या तासानं कबीरची आई नीतू यांनी त्याला स्पर्श केला तेव्हा त्याचं शरीर थंड पडलं होतं. त्यांनी लगेच डॉक्टरांना बोलावलं, तेव्हा डॉक्टरांनी त्याला शुद्धीवर यायला आणखी काही वेळ लागेल, असं सांगितलं.परंतु बराच वेळ झाला तरी कबीरला शुद्ध आली नाही. त्यानंतर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू (Death) झाला असल्याचं सांगितलं. त्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना कबीरच्या मृत्यूचं कारण विचारलं तेव्हा ते कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत. असं पहिल्यांदाच घडलं असल्याचं त्यांनी सांगितलं. आधी डोळे काढले, मग..; बापानंच केली 8 वर्षीय मुलीची हत्या, कारण ऐकून बसेल धक्का अॅनेस्थेशियाचा अतिरेक (Anaesthesia) आणि हलगर्जीपणा यामुळे कबीरचा मृत्यू झाल्याचा आरोप करत तिवारी कुटुंबाने रुग्णालयात गोंधळ घातला. त्यांनी रुग्णालयाविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी शवविच्छेदनासाठी कबीरचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. कबीरचे वडील सुनील तिवारी म्हणाले की, गॅस्ट्रो-एन्ट्रॉलॉजिस्ट डॉ. मयंक जैन आणि भूल तज्ज्ञ डॉ. सोनल निवस्कर यांना कबीरच्या मृत्यूचे कारण सांगता आले नाही. माझ्या मुलाचा मृत्यू अॅनेस्थेशियाच्या जादा डोसमुळे झाला आहे. डॉक्टर आपली चूक मान्य करत नाहीत. मुलाच्या हृदयाचे ठोके अचानक बंद झाले, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं; पण उपयोग झाला नाही, असं डॉक्टर सांगत आहेत; पण हे चुकीचं आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच मला माझा एकुलता एक मुलगा गमवावा लागला आहे. अरिहंत हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. संजय राठोड यांनी म्हटलं आहे की, तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने मुलाचे ऑपरेशन केले आहे. पूर्व तपासणीनंतर एंडोस्कोपीद्वारे चुंबक काढले गेले. त्यानंतर एनआयसीयूमध्ये हलवण्यात आले. तिथं त्याची तब्ब्येत खालावली; पण मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेलं नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमके कारण कळेल. प्रमाणाबाहेर अॅनेस्थेशिया दिल्यानं मुलाचा मृत्यू झालेला नाही. आम्ही सर्व वैद्यकीय कागदपत्रे पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत. भूलतज्ज्ञ डॉ. सोनल निवस्कर आणि गॅस्ट्रो-एन्ट्रॉलॉजिस्ट डॉ. मयंक जैन हे चांगले तज्ज्ञ आहेत. संपूर्ण उपचार वैद्यकीय प्रोटोकॉल अंतर्गत करण्यात आलेले आहेत.
First published:

Tags: Baby died, Madhya pradesh

पुढील बातम्या