काश्मीरमध्ये सैन्याने केला 3 दहशतवाद्यांचा खात्मा; 2 जवान शहीद

काश्मीरमध्ये सैन्याने केला 3 दहशतवाद्यांचा खात्मा; 2 जवान शहीद

तर या चकमकीत भारतीय सैन्याचे दोन जवानही शहीद झाले आहेत.शहीद झालेल्यांपैकी एक जवान सुमेध गवई महाराष्ट्रातल्या अकोल्यातील लोणाग्रा येथील आहे.

  • Share this:

शोपिया,13 ऑगस्ट: शोपिया जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याने खात्मा केला आहे. तर या चकमकीत भारतीय सैन्याचे दोन जवानही शहीद झाले आहेत.शहीद झालेल्यांपैकी एक जवान सुमेध गवई महाराष्ट्रातल्या अकोल्यातील लोणाग्रा येथील आहे.

हे तिन्ही दहशतवादी हिजबुल संघटनेचे असल्याचं सांगितलं जातंय. मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांची नावं इमरान शेख, उमर मजीद आणि आदिल मालिक आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शोपिया जिल्ह्यातील अवनीरा गावातील या चकमकीत भारतीय सैन्याचे दोन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. दरम्यान भारतीय सैन्याने परिसरात नाकाबंदी केली आहे. तसंच, लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेणं सुरु आहे

First published: August 13, 2017, 1:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading