मुंबई, 16 जुलै : Indian Commercial Pilots Association यांनी आज एअर इंडियाचे सीएमडी राजीव बंसल यांना पत्र लिहिलं आहे. एअर इंडियाच्या वैमानिकांना गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून (एप्रिल 2020) 70 टक्के पगार मिळाला नसल्याचे या पत्रात म्हटले आहे.
काल एअर इंडियाच्या निर्णयानुसार काही कर्मचाऱ्यांना 6 महिने ते 60 आठवड्यांपर्यंत विना पगारी सक्तीची रजा देण्यात येणार आले. यासंदर्भात बोर्डाकडून परवानगीही मिळाली आहे. हा निर्णय एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी चिंता वाढवणारा आहे. त्यात आज एअर इंडियाच्या वैमानिकांनी सीएमडी राजीव बंसल यांना पत्र लिहून सवाल उपस्थित केला आहे. एप्रिल महिन्यापासून त्यांना केवळ 30 टक्के पगार दिला जात असल्याचे त्यात म्हटले आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना 3 टक्के पगार कपात केली जात असून वैमानिकांना 60 टक्के पगार कपात करण्याबाबत सांगितले जात आहे. हा कुठला नियम असा प्रश्न वैमानिकांनी विचारला आहे. तर दुसरीकडे एप्रिल 2020 पासून आम्हाला 70 टक्के पगार मिळाला नसल्याने वैमानिकांनी या पत्रात नमूद केले आहे.
Indian Commercial Pilots' Association writes a letter to Air India CMD Rajiv Bansal over proposed cut in payments to pilots. "We have not been paid 70 per cent of our pay since April 2020," the letter reads. pic.twitter.com/B1Br9BtaQN
वरिष्ठ अधिकाऱ्यांना केवळ 3.5 टक्के पगार कपात केली जात असून सह वैमानिकांना 60 टक्के पगार कपात केली जात आहे.
आतापर्यंत 55 वैमानिकांना कोरोनाची लागण झाली असून अशा परिस्थितीत पगार कपात करुन त्यांचा त्रास वाढवणं योग्य नाही.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.