सुरक्षा दलाला मोठे यश, पुलवामामध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलाला मोठे यश, पुलवामामध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले आहेत.

  • Share this:

जम्मू, 1 एप्रिल: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले आहेत. या चकमकीत भारतीय लष्कराचे 3 जवान आणि एक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही दिवासांपासून भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली आहे.

पुलवामा जिल्ह्यातील लासीपुरा येथे दहशतवादी लपल्याची माहिती कळताच भारतीय सुरक्षा दलाने या भागात सर्च ऑपरेशन सुरु केले. तेव्हा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्यात चकमक झाली. चकमकीच्या ठिकाणाहून दोन एके रायफल्स, 1 एसएलआर आणि 1 पिस्तुल सापडली आहे. चकमक झाल्यानंतर भारतीय लष्कराने या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

खात्मा करण्यात आलेले सर्व दहशतवादी लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला असून दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलातील जवानही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तीन दिवसांपूर्वीही बडगाम येथे सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत जैश- ए- मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

VIDEO : विखे आणि थोरात एकत्र पण एकमेकांकडे पाहिलेही नाही

First published: April 1, 2019, 7:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading