कोर्टातल्या रामजन्मभूमीच्या वादात स्वतः भगवान रामचंद्रच आहेत एक पक्षकार

कोर्टातल्या रामजन्मभूमीच्या वादात स्वतः भगवान रामचंद्रच आहेत एक पक्षकार

अयोध्येच्या वादग्रस्त राम जन्मभूमी प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या या केसमध्ये तीन प्रमुख पक्षकार आहेत. त्यातले एक आहेत दस्तुरखुद्द भगवान रामचंद्र. ही नेमकी केस काय आहे आणि कोर्टाच्या मध्यस्थांच्या निर्णयाचा अर्थ काय?

  • Share this:


नवी दिल्ली, 8 मार्च : अयोध्येच्या वादग्रस्त रामजन्मभूमी प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मोठा निर्णय देत मध्यस्थांच्या नियुक्तीची घोषणा सुप्रीम कोर्टानं केली आहे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या या केसमध्ये तीन प्रमुख पक्षकार आहेत. त्यातले एक आहेत दस्तुरखुद्द भगवान रामचंद्र. ही नेमकी केस काय आहे आणि कोर्टाच्या मध्यस्थांच्या निर्णयाचा अर्थ काय?

सुप्रीम कोर्टात केस सुरू आहेत, त्यात तीन प्रमुख पक्षकार आहेत.


तीन पक्षकार कोण?

पहिला पक्ष आहे मंदिराच्या गाभाऱ्यातील राम. रामाच्या वतीने विश्व हिंदू परिषद लढत आहे.

दुसरा पक्ष आहे निर्मोही आखाडा. हा हिंदू साधूंचा सर्वात मोठा आखाडा मानला जातो. निर्मोही आखाड्यातर्फे गेली 100 वर्षं राम मंदिराचा प्रश्न लावून धरण्यात आला आहे.

तिसरा पक्ष आहे मुसलमानांचा. बाबरी मशिदीच्या जागेवर पुन्हा राम मंदिराची उभारणी करण्यास या पक्षाचा आक्षेप आहे. सुन्नी वक्फ बोर्ड हा पक्ष लढवत आहे.


कोण आहेत मध्यस्थ?

राममंदिराच्या जागेवर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मध्यस्थांच्या नियुक्तीची केली आहे. मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना कोर्टाकडून करण्यात आली. त्रिसदस्यीय समितीमध्ये श्री श्री रविशंकर, जस्टिस इब्राहिम खलिफुल्ला आणि श्रीराम पंचू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दर 14 दिवसांनी या समितीला कोर्टामध्ये प्रगती अहवाल सादर करावा लागणार आहे. समितीचं कामकाज देखील गोपनीय असणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे या समितीच्या कामकाजाची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यास बंदी आणण्यात आली आहे. समितीचे कामकाज इन कॅमेरा होणार असून सर्व प्रक्रिया फैजाबादमध्ये होणार आहे. न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी हा निर्णय दिला आहे. या समितीचे अध्यक्ष खलिफुल्ला असणार आहेत. पुढील चार आठवड्यांमध्ये मध्यस्थांनी आपले कामकाज सुरू करावे आणि आठ दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करावा, असं सुप्रीम कोर्टानं सुनावणीदरम्यान सांगितले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2019 02:45 PM IST

ताज्या बातम्या