S M L

येत्या तीन दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

शनिवारी संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आला आहे.

Sonali Deshpande | Updated On: Aug 16, 2017 10:30 AM IST

येत्या तीन दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

16 आॅगस्ट : तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ प्रतीक्षा करायला लावणारा पाऊस पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभर सक्रिय होणार आहे. गुरुवारपासून विदर्भात, तर शुक्रवारपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी येण्याची शक्यता आहे. शनिवारी संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आला आहे.

पश्चिम किनारपट्टीवर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने दोन दिवस मुंबईत पावसाच्या सरींची संख्या वाढली. कोकणात पावसाच्या सरी थांबल्या नसल्या तरी राज्याच्या इतर भागात मात्र तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाने दर्शन दिले नसल्याने पिके करपली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 10:30 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close