देशातील नवीन रुग्णांची संख्या ब्राझीलपेक्षा जास्त, 24 तासांतील चिंताजनक आकडेवारी

देशातील नवीन रुग्णांची संख्या ब्राझीलपेक्षा जास्त, 24 तासांतील चिंताजनक आकडेवारी

गेल्या 24 तासांत रेकॉर्ड 28 हजार 701 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत एका दिवसात मिळालेले सर्वाधिक रुग्ण आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जुलै : देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 8 लाख 78 हजार 254 झाली आहे. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड 28 हजार 701 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत एका दिवसात मिळालेले सर्वाधिक रुग्ण आहेत. तर, एका दिवसात 500 जणांचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी एकाच दिवसात 28 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे. देशातील नवीन रुग्णांची संख्या ब्राझीलपेक्षाही जास्त आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात 3 लाख एक हजार 609 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 23 हजार 174 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 5 लाख 53 हजार 470 लोकं निरोगी झाली आहेत. देशाचा निरोगी रुग्णांचा दर 63.1 % झाला आहे तर सकारात्मकता दर 13.09% आहे.

रविवारी सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र राज्यात सापडले होते. राज्यात 24 तासात 7,827 रुग्ण सापडले, यासह एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 54 हजार 427 झाली आहे. तर तामिळनाडुमध्ये 4,244, कर्नाटकात 2,627, दिल्लीत 1,573, पश्चिम बंगालमध्ये 1,560, उत्तर प्रदेशात 1,384 आणि तेलंगणात 1,269 नवीन रुग्ण आढळून आले. देशात रविवारी 18 हजार 139 रुग्ण निरोगी झाले. यामुळे सध्या रिकव्हरी रेट 63% झाला आहे.

जगातील तिसरा प्रभावित देश

जगभरातील सर्वात जास्त कोरोनाबाधित असलेल्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताआधी ब्राझील आणि अमेरिका यांचा क्रमांक लागतो. मात्र भारताचा रिकव्हरी रेट इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे. भारतापेक्षा जास्त प्रकरणं अमेरिका (3,413,936), ब्राझीलमध्ये (1,866,176) आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: July 13, 2020, 10:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading