मराठी बातम्या /बातम्या /देश /

Oxygen लेव्हल 23 वर गेल्याने 27 दिवस व्हेंटिलेटरवर, वजन 30 किलोहून कमी होऊनही कोरोनाला हरवलंच!

Oxygen लेव्हल 23 वर गेल्याने 27 दिवस व्हेंटिलेटरवर, वजन 30 किलोहून कमी होऊनही कोरोनाला हरवलंच!

12 सप्टेंबर रोजी त्यांची तब्येत अतिशय खालावली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. 2 ऑक्टोबरपर्यंत ते व्हेंटिलेटरवर होते. यादरम्यान त्यांचं 30 किलो वजन कमी झालं. ऑक्सिजन लेवल अनेकदा 30 च्या खाली आली होती.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma

श्रीनगर, 28 एप्रिल: देशभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. अनेक निगेटिव्ह बातम्या कानावर येत असताना, अशात एक अतिशय सकारात्मक बातमी समोर आली आहे. कोरोना काळात ही सकारात्मकता लोकांना नक्कीच हिंमत देऊ शकते. शिमला शहराचे फूड सेफ्टी ऑफिसर अशोक मंगला यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांची ऑक्सिजन लेवल 23 इतकी ड्रॉप झाली होती. यादरम्यान ते तब्बल 27 दिवस IGMC रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते. यात त्यांचं वजन 30 किलोग्रॅम इतकं कमी झालं होतं, या सर्व परिस्थितीवर मात करत त्यांनी कोरोनाला अखेर हरवलंच. स्वत:ची कोरोनाशी असलेली लढाई यशस्वीरित्या जिंकली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अशोक मंगला यांनी सांगितलं, की 3 सप्टेंबर रोजी त्यांना ताप आणि थकवा आल्यानंतर ते रुग्णालयात गेले, येथे त्याचं सँपल घेतलं गेलं आणि काही वेळातच त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं समजलं. रिपोर्ट ऐकल्यानंतर त्यांनी ते अतिशय घाबरल्याचं सांगितलं, कारण घरी वृद्ध आई-वडील आणि दोन मुलं होती. ते लगेच रुग्णालयात दाखल झाले.

7 सप्टेंबर रोजी त्यांचा एक्सरे घेतला गेला आणि डॉक्टरांनी त्यांना रिपोर्ट पाहून दाखल असलेल्या एका रुग्णालयातून IGMC रुग्णालयात भरती होण्यास सांगितलं. 12 सप्टेंबर रोजी त्यांची तब्येत अतिशय खालावली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. 2 ऑक्टोबरपर्यंत ते व्हेंटिलेटरवर होते. यादरम्यान त्यांचं 30 किलो वजन कमी झालं. ऑक्सिजन लेवल अनेकदा 30 च्या खाली आली होती. मात्र 2 ऑक्टोबरनंतर त्यांच्या तब्येतीत काहीशी सुधारणा होऊ लागली.

(वाचा - 'मी जीवन जगलो आहे, यांची मुलं अनाथ होतील' RSS स्वयंसेवकाने केला बेडचा त्याग)

तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. परंतु काही दिवसांत तब्येत पुन्हा बिघडली. काही तपासण्या केल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसात काही समस्या असल्याचं समजलं. 10 ऑक्टोबरला त्यांना पुन्हा IGMC मध्ये दाखल केलं गेलं. 25 ऑक्टोबरला तब्येत आणखी बिघडली आणि पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. या काळात ते 7 दिवस व्हेंटिलेटरवर होते. उपचारादरम्यान त्यांची तब्येत सुधारू लागली आणि काही दिवसांत ते बरे झाले.

(वाचा - सकारात्मक विचार आणि पोटावर झोपणे या जोरावर 82 वर्षीय आजींची कोरोनावर मात)

या काळात डॉक्टरांनी अतिशय मदत केल्याचं, तसंच दररोज प्रोत्साहन दिल्याचं मंगला यांनी सांगितलं. डॉक्टरांच्या मेहनतीमुळेच, मी आज पुन्हा एकदा उभा राहू शकलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Covid19, Jammu kashmir