मराठी बातम्या /बातम्या /देश /धक्कादायक! शाळेतील 265 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

धक्कादायक! शाळेतील 265 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कोरोनावर लस आल्यानंतर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथील करत शाळा, महाविद्यालयं सुरु करण्यात आली. अशामध्ये दोन शाळांतील तब्बल 187 विद्यार्थी आणि 78 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोरोनावर लस आल्यानंतर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथील करत शाळा, महाविद्यालयं सुरु करण्यात आली. अशामध्ये दोन शाळांतील तब्बल 187 विद्यार्थी आणि 78 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोरोनावर लस आल्यानंतर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथील करत शाळा, महाविद्यालयं सुरु करण्यात आली. अशामध्ये दोन शाळांतील तब्बल 187 विद्यार्थी आणि 78 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तिरूवनंतपुरम, 8 फेब्रुवारी : भारतात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पण कोरोनाची भीती अद्याप कमी झालेली नाही. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे पण काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनावर लस आल्यानंतर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथील करत शाळा, महाविद्यालयं सुरु करण्यात आली. अशामध्ये दोन शाळांतील तब्बल 187 विद्यार्थी आणि 78 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

केरळमधील मलप्पूरमध्ये असलेल्या दोन शाळांतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पेरुंबडप्पू येथील मॅरन्चेरी गव्हर्नमेंट हायर सेकंडरी स्कूल आणि वॅनेरी हायर सेकंडरी स्कूलमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. रविवारी सर्वांचा कोरोना तपासणी अहवाल आला असून यामधील 187 विद्यार्थी आणि 78 स्टाफला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जिल्हा आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, '1 फेब्रुवारीला मॅरन्चेरी गव्हर्नमेंट हायर सेकंडरी स्कूलमधील दहावीच्या एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समजले. त्यानंतर शाळेतील काही विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कोरोना तपासणी करुन घेण्यात आल्या होत्या.'

(वाचा - कोरोनानंतर आता आणखी दोन महाभयंकर संकटं; बिल गेट्स यांचा जगाला सावध करणारा VIDEO)

'कोरोना तपासणीनंतर आलेल्या अहवालात शाळेतील तीन शिक्षकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली. त्यानंतर आरोग्य विभागाने शुक्रवारी शाळेतील 582 विद्यार्थी आणि 50 कर्मचाऱ्यांचे नमुने गोळा करुन कोरोना तपासणीसाठी पाठवले. तपासणी अहवालामध्ये यामधील 148 विद्यार्थी आणि 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.', असे आरोग्य विभागाने परिपत्रकात म्हटले आहे.

आरोग्य विभागाने यानंतर खबरदारी म्हणून जवळच्या व्हॅनेरी हायर सेकंडरी स्कूलमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे कोरोना तपासणीसाठी नमुने गोळा केले. यामधील 49 विद्यार्थी आणि 39 कर्मचाऱ्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

जिल्हा वैद्यकीय अधिकारी के. सकीना यांनी सांगितले की, 'या दोन शाळा आणि आजूबाजूच्या परिसरात कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाची लागण झालेले शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांच्या कोरोना तपासण्या लवकरच करण्यात येतील.'

(वाचा - भारतातील कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणं इतक्या झपाट्यानं कमी कशी झाली?)

दोन्ही शाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'कोविड प्रोटोकॉलनंतर शाळा सुरु करण्यात आल्या. प्रत्येक वर्गात मर्यादित संख्येत विद्यार्थी होते. एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आरोग्य विभागाने इतर विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या. विद्यार्थ्यांसह सर्वच लोकांची जबाबदारी आहे की त्यांनी मास्कचा वापर केला पाहिजे तसंच त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे देखील पालन केले पाहिजे. विशेषत: विद्यार्थ्यांनी हे संक्रमण टाळण्यासाठी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे.', असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि आरोग्य विभागाला धारेवर धरले आहे. 'राज्य सरकारने प्रसिद्धीसाठी बनावट कोविड प्रतिबंधक मॉडेल तयार केले आहे. आता तरी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना विषाणूपासून वाचवण्यासाठी योग्य ती उपाययोजना केली पाहिजे.', असे युवा काँग्रेसचे मलप्पुरमचे जिल्हाध्यक्ष शाजी पचेरी यांनी म्हटले आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Corona virus in india