Home /News /national /

पाकचा नापाक प्लॅन! तब्बल 250 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत

पाकचा नापाक प्लॅन! तब्बल 250 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत

चिनी सैन्य भारतात घुसण्याचा प्रयत्न करत असतानाच पाकिस्ताननं सुरू केलेलं नवं कारस्थान भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतं.

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : एकीकडे भारत-चीन यांच्यातील तणाव कमी होताना दिसत नाही आहे. चीनच्या कुरघोड्या सुरूच असताना आता पाकिस्तानातून 250 दहशतवादी सीमा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. काश्मीर सीमेवर हे पाकिस्तान सध्या लक्ष ठेवत असून त्यांना चीनची मदतही मिळत आहे. चिनी सैन्य भारतात घुसण्याचा प्रयत्न करत असतानाच पाकिस्ताननं सुरू केलेलं नवं कारस्थान भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याआधीच चीन आणि पाकिस्तान मिळून कारस्थान रचत असल्याचे सांगितले होते. याआधी 10 ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांचा भारतात घुसण्याचा प्रयत्न लष्करानं उधळून लावला होता. मेजर जनरल अमरदीपसिंह औजल यांनी सांगितले की, उन्हाळ्यात सीमेपलीकडून घुसखोरीचे जितके प्रयत्न होत आहे, तितकेच हिवाळ्यातही झाले. मात्र सर्व प्रयत्न लष्करानं उधळून लावले. वाचा-चीन आणि पाकिस्तानला धडकी भरवणारा काय आहे भारताचा BR प्लॅन? चीन आणि पाकिस्तानला धडकी BR प्लॅन चीन किंवा पाकिस्तानशी युद्ध झालं तर लष्कर आणि वायुसेनाच महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे भारताने BR प्लॅन तयार केला आहे. B म्हणजे भीष्म रणगाडा आणि R म्हणजे राफेल फायटर जेट विमान. लडाखमध्ये 15 ते 17 हजार फूट उंचीवर भारतीय सैन्याने भीष्म रणगाडे तैनात केले आहेत. चीनच्या T-63 या T-99 रणगाड्यांपेक्षा भारताचे रणगाडे जबरदस्त शक्तिशाली असल्याचंही सैन्यानं सांगितलं आहे. त्यामुळे जर चीननी युद्ध केलं तर त्यांनाच जोरदार चपराक बसेल हे भारताच्या शस्रसिद्धतेमुळे स्पष्ट दिसत आहे. दुसरीकडे या प्लॅनच्या R भागासाठी भारतीय वायुसेना राफेल फायटर जेट विमानांसह सज्ज आहे. त्यामुळे पाकिस्तान घाबरला असून त्यांचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी भारतानी राफेल आणल्यावरच त्यांच्या मनातील भीती व्यक्त केली होती. वाचा-मुजोर चीनला आणखी एक दणका, अरुणाचल प्रदेशसाठी केंद्राचा मोठा निर्णय भारताचा प्लॅन B पण तयार हो, भीष्म रणगाडा आणि राफेल व्यतिरिक्त भारतीय सैन्यदलांकडे अनेक आधुनिक शस्रास्र आहेत. त्याचबरोबर गेल्या महिन्यात आपण 10 क्षेपणास्रांच्या यशस्वी चाचण्याकरून आपल्या शत्रूंना युद्धसिद्धतेचा स्पष्ट संकेत दिला आहे. कोणत्याही हिंसेचं उत्तर भारत तितक्याच ताकदीनी देईल हे भारताने स्पष्ट केलं आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या