चेन्नई, 19 जानेवारी: सोमवारी सायंकाळी एका 25 वर्षीय युवकाने डेबिट कार्डने आपली नस आणि गळा कापल्याची (slit wrist and throat with debit card) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुणाने सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका 53 वर्षीय महिलेच्या घरात घुसून हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेनं गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला अडवून या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता, संबंधित तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला आहे. पोलिसांनी तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. ही घटना तामिळनाडूतील (Tamilnadu) पेरावल्लूर (Peravallur) येथील आहे.
याबाबत पोलिसांनी संबंधित तरुणाची अधिक चौकशी केली असता, त्याचं नाव अरविंधन असून तो पुडुचेरी येथील रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. तसेच अरविंधन याने ज्या महिलेच्या घरात आत्महत्येचा प्रयत्न केला, त्या महिलेची मुलगी आणि तो एका खाजगी विद्यापीठात 2018 पासून एकत्र शिकत होते. दरम्यान त्याने संबंधित महिलेच्या मुलीला 3.5 लाखांची आर्थिक मदत केली होती. पण संबंधित महिलेनं आणि तिच्या मुलीने पैसे परत देण्यास उशीर केला होता.
हेही वाचा- लातुरात तरुणाला जिवंत जाळलं; महिनाभरानं उलगडलं गूढ, भावजय ठरली मृत्यूचं कारण
त्यामुळे अरविंधन हा सोमवारी संबंधित महिलेच्या घरी आला होता. यावेळी संबंधित महिलेनं घरी चोर आल्याचं सांगत मोठ्यानं आरडाओरडा केला. त्यामुळे अरविंधन यानं स्वत:ला महिलेच्या घरात कोंडून घेतलं आणि खिशातील डेबिट कार्डने स्वत:च्या नसा आणि गळा कापला, अशी माहिती जखमी तरुणाने पोलिसांना दिली आहे.
हेही वाचा-साखरपुड्याच्या 3दिवस आधीच मृत्यूनं गाठलं; औरंगाबादेत होतकरू तरुणाचा दुर्दैवी अंत
तर संबंधित महिलेनं मात्र वेगळाच दावा केला आहे. संबंधित महिलेच्या मते, 'जखमी अरविंधन हा तिच्या घरासमोर संशयास्पद हालचाली करत होता. यावेळी त्यानं संबंधित महिलेकडे फोन मागितला. पण तिने फोन द्यायला नकार दिला. त्यामुळे अरविंधन याने तिच्यावर हल्ला केला आणि तिच्या घरात शिरून स्वत:ला कोंडून घेतलं.' पोलिसांनी दोघांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत. ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी या महिलेची मुलगी घरी नव्हती. दोन्ही बाजूने या घटनेचा तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chennai, Crime news, Suicide attempt, Tamilnadu