पाली (राजस्थान), 21 मे : कोरोना विषाणूला (Corona Virus) आजही अनेक जण सर्वसाधारण समजतात आणि त्याविषयी फार खबरदारी घेण्याकडं दुर्लक्ष करतात. मात्र, एखाद्या कुटुंबामध्ये किंवा एखाद्या गावात जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू होतो, त्यावेळी मात्र कोरोना काय रूप दाखवू शकतो आहे ते त्या लोकांना चांगलं समजतं. आणि मग सर्वजण हरतऱ्हेनं कोरोना नियंत्रणात आणण्याच्या पाठीमागं लागतात. अशीच एका गावातील ही घटना समोर आली आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 40 ते 45 दिवसांमध्ये गावात वीस ते पंचवीस जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तरुणांचाही समावेश असल्यानं भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र, सरकारी आकडेवारीनुसार हे सर्वच मृत्यू कोरोनानं झाले नसल्याचे सांगण्यात आलं आहे. मात्र, गावातील लोक मृतांची रांग लागल्यानं चांगलेच घाबरून गेले होते. जेव्हा मृत्यूची मालिका थांबण्याचं नाव घेईना तेव्हा ग्रामस्थांनी धार्मिक गोष्टींवर विश्वासात ठेवत, गावात मध्य रात्रीच्या सुमारास ढोल ताशा वाजवत भगवान हनुमान आणि भेरूजी यांचा जयघोष करत संपूर्ण गावाभोवती लक्ष्मण रेखा आखली. असं केल्यानं गावात महामारी होणार नाही आणि मृत्यूची मालिका थांबेल, असा त्यांचा विश्वास आहे. ग्रामस्थांच्या कृत्याला धार्मिक श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हटलं जाऊ शकतं. परंतु, महामारीच्या काळात अनेक ठिकाणी लोक अशा वेगवेगळ्या मार्गांनी साथीचा रोग थांबवण्यासाठी उपाय करून पाहतात. देवाला संतुष्ट केल्यानं ही महामारी कदाचित थांबेल असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे.
हे वाचा - ‘मृतदेहांचे खच पडलेत त्याचं काय?’ बनारस मॉडेलवरून नवाब मलिकांची मोदींवर टीका
हा सर्व प्रकार राजस्थानच्या पाली (Pali Rajasthan) जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या आबाद खारडा गावातील आहे. 45 दिवसांमध्ये गावात वीस ते पंचवीस जणांचा मृत्यू झाल्यानं गावकरी चांगले हादरुन गेले आहेत. वैद्यकीय उपचार घेऊनही मृत्यू थांबेनात म्हटल्यानंतर शेवटी गावकऱ्यांनी या गावाभोवती लक्ष्मण रेषा मारायचं ठरवलं आणि एके दिवशी मध्यरात्री हा विधी आवरला या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र, लोकांचा असा विश्वास असला तरी कोणीही अशा घटनांऐवजी कोरोना रुग्णांना दवाखान्यात नेणं गरजेचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Corona virus in india, Coronavirus, Rajasthan