मराठी बातम्या /बातम्या /देश /

खाकी वर्दीतली माणुसकी! कॉन्स्टेबल सय्यद ताहिर यांनी रक्तदान करून वाचवले गर्भवती महिलेचे प्राण

खाकी वर्दीतली माणुसकी! कॉन्स्टेबल सय्यद ताहिर यांनी रक्तदान करून वाचवले गर्भवती महिलेचे प्राण

तामिळनाडूमध्ये हेड कॉन्स्टेबलने सय्यद ताहिर यांनी महिलेची मदत केल्यामुळे तिचे आणि तिच्या बाळाचे प्राण वाचले आहेत.

तामिळनाडूमध्ये हेड कॉन्स्टेबलने सय्यद ताहिर यांनी महिलेची मदत केल्यामुळे तिचे आणि तिच्या बाळाचे प्राण वाचले आहेत.

तामिळनाडूमध्ये हेड कॉन्स्टेबलने सय्यद ताहिर यांनी महिलेची मदत केल्यामुळे तिचे आणि तिच्या बाळाचे प्राण वाचले आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar
त्रिची (तामिळनाडू), 26 एप्रिल : कोरोनामुळे (Coronavirus) आपण पाहतो आहोत की समाजात फार वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर घरच्यांनी देखील कोरोना रुग्णांची साथ सोडली आहे. मात्र अनेक घटना अशा आहेत, की त्या आपल्याला सकारात्मक विचार करायला भाग पाडतात. कोणतीही ओळख नसताना एकमेकांना मदत करत अनेकांनी माणुसकी दाखवली आहे. अगदी अशी मदत करताना धर्म सुद्धा मागे पडतो आहे. धर्माचा विचार न करता माणुसकीचा विचार करून मदत केली जात आहे. (हे वाचा-तुम्हीही होऊ शकता कोरोना वॉरिअर्स, PM मोदींनीच सांगितली प्रक्रिया) तर आज आम्ही तुम्हाला ज्या घटनेबद्दल सांगत आहोत ती आहे तमिळनाडूच्या त्रिची या ठिकाणची. त्रिचीमध्ये एका गरीब कुटुंबातील स्त्रीला प्रसुतीकळा सुरू झाल्यानंतर तिला 7 किलोमीटर लांब असणाऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या महिलेच ऑपरेशन करणं गरजेच आहे आणि तिला रक्ताची गरज असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. दरम्यान लॉकडाऊनमुळे त्याठिकाणी रक्त सहज उपलब्ध होणं शक्य नव्हतं. परिणामी तिच्या नवऱ्याने बाहेर पडून मदत मागण्याचे ठरवले. मात्र त्याला कोणाकडून मदत मिळाली नाही. बाहेर पडल्यामुळे पोलिसांनी मात्र या इसमाला अडवून बाहेर पडण्याचं कारण विचारलं. त्याची कहाणी ऐकल्यानंतर त्याठिकाणी तैनात असणारे 23 वर्षीय कॉन्स्टेबल सय्यद अबू ताहिर यांचा रक्तगट देखील तोच असल्याचे लक्षात आले. त्यांनी क्षणार्धात रक्त देण्याचे कबूल केले. ताहिर यांनी केलेल्या मदतीनंतर बाळ आणि बाळंतीण दोघही सुखरूप आहेत. ताहिर यांच्या कृतीचे तामिळनाडू पोलिसांकडून आणि परिसरातील इतर नागरिकांकडून देखील कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान त्यांना बक्षीस म्हणून जिल्हा पोलीस प्रमुखांनी एक हजार रुपये तर राज्य पोलीस महासंचालकांनी 10 हजार रुपये रक्कम दिली. तर कॉन्स्टेबल सय्यद ताहिर यांनी त्यानंतर केलेल्या कामाचं तुम्ही आणखी कौतुक कराल. त्यांनी मिळालेले 11 हजार रूपये सुलोचना म्हणजेच त्या बाळाच्या आईला दवापाण्याच्या खर्चासाठी देऊ केले. आयपीएस असोसिएशने ताहिर यांची ही कहाणी ट्विटरवरून शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमधून ताहिर यांचे कौतुक तर केलेच आहे पण त्यांना सलाम देखील केला आहे. खरंच कॉन्स्टेबल ताहिर सय्यद यांच्या कामाला सलाम! संपादन - जान्हवी भाटकर
First published:

Tags: Tamilnadu

पुढील बातम्या