पाटणा 20 सप्टेंबर : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचंही समोर येत आहे. बिहारमध्येही गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसासोबतच विजांचा कडकडाटही सातत्याने सुरू आहे. विज कोसळून झालेल्या दुर्घटनेत बिहारमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे
लग्नाचे भुत डोक्यात; प्रेयसी प्यायली टॉयलेट क्लिनर तर विवाहित प्रियकराने काय केलं पाहा?
सोमवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. बिहारमध्ये सोमवारी वीज पडून तब्बल 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत 8 मुलांसह अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत. विज कोसळल्याने अररिया आणि पूर्णियामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुपौलमध्ये तीन, सहरसा, बांका आणि जमुईमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
रोहतास जिल्ह्यातील देहरी उपविभागातील अकोडीगोला येथील धरहरा येथे जुन्या शिवमंदिराच्या घुमटावर अचानक वादळ आलं. या घटनेत मंदिराच्या कळसावर भेगा पडल्या नाहीत मात्र मंदिरातून धूर निघू लागला. यात मंदिराचं मोठं नुकसान झालं आहे. मंदिराच्या आजूबाजूला धुराचे लोट येऊ लागले होते.
हे दृश्य स्थानिक लोकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं. हे शिवमंदिर खूप जुनं असल्याचं सांगितलं जातं. मंदिराच्या कळसामधून धूर निघत असल्याचं पाहून अनेक लोक तिथे जमा झाले. बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने विजांचा कडकडाटसह हजेरी लावली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Rain, Shocking news