मराठी बातम्या /बातम्या /देश /

3 महिन्यांचं प्रेम अन् 20 दिवसाचा संसार, अतिशय भयावह झाला लव्ह स्टोरीचा THE END

3 महिन्यांचं प्रेम अन् 20 दिवसाचा संसार, अतिशय भयावह झाला लव्ह स्टोरीचा THE END

नेहा चौहान असं आत्महत्या करणाऱ्या 22 वर्षीय नवविवाहित महिलेचं नाव आहे. (फोटो-वर्दीवाला)

नेहा चौहान असं आत्महत्या करणाऱ्या 22 वर्षीय नवविवाहित महिलेचं नाव आहे. (फोटो-वर्दीवाला)

Suicide News: प्रेमविवाह झाल्यानंतर अवघ्या वीस दिवसात एका तरुणीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (woman commits suicide after 20 days of love marriage) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk
ग्वालियर, 22 ऑक्टोबर: प्रेमविवाह झाल्यानंतर अवघ्या वीस दिवसात एका तरुणीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (woman commits suicide after 20 days of love marriage) केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुणीनं पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून (Persecution by husband) आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आत्महत्येची ही घटना उघडकीस आल्यानंतर, मृत मुलीच्या कुटुंबाच्या फिर्यादीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. संशयित आरोपी पती सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. नेहा चौहान असं आत्महत्या करणाऱ्या 22 वर्षीय नवविवाहित महिलेचं नाव आहे. तर राहुल बाथम असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचं नाव असून तो पटेल नगर हरगोविंदपुरम येथील रहिवासी आहे. मृत नेहाची अवघ्या तीन महिन्यांपूर्वी आरोपी राहुलशी ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर, अवघ्या काही दिवसांतच दोघांनी गावाजवळील एका मंदिरात जाऊन प्रेमविवाह केला होता. मृत मुलीने आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन हा विवाह केला होता. तिने आरोपी राहुलसोबत सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तिचा भ्रम निरास झाला आहे. हेही वाचा-प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला दिला रोज थोडा-थोडा मृत्यू;पत्नीचा कांड वाचून हादराल नेमकं प्रकरण काय आहे? 22 वर्षीय मृत विवाहित नेहा सिटी सेंटर पटेल नगरमधील शोरूमजवळील एका खाजगी कार्यालयात काम करायची. कामावर येता-जाता तिची ओळख राहुल बाथमशी झाली होती. हळूहळू दोघांची मैत्री वाढत गेली भेटी गाठी वाढल्या. 22 ऑगस्ट रोजी दोघांनीही आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन गावाजवळील एका मंदिरात जाऊन प्रेमविवाह केला. पण लग्नानंतर लगेच दोघा प्रेमींमध्ये वादाला सुरू झाली. लग्नाच्या दुसऱ्या दिवसानंतरच आरोपी राहुल तिला मारझोड करू लागला. हेही वाचा-मित्रानेच दिला दगा; पुण्यात तरुणीला ज्यूसमधून गुंगीचं औषध देत घृणास्पद कृत्य तसेच तो कोणतंही काम करत नव्हता, त्यामुळे घरचा सर्व खर्च मुलीलाच करावा लागत होता. असं असताना पतीला दारुचं व्यसन असल्याचंही तिला कळालं. लग्नानंतर वीस दिवसांतच आरोपीनं दारू पिऊन पीडित तरुणीला अनेकदा मारहाण केली आहे. दरम्यान 11 सप्टेबर रोजी मृत्यूच्या आदल्या दिवशी देखील नेहा आणि राहुल यांच्यात वाद झाला होता. वादानंतर दोघं पती-पत्नी आपल्या घरात झोपले होते. 12 सप्टेंबर रोजी पती राहुल झोपेतून उठला असता, त्याच खोलीत नेहा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली आहे. या प्रकरणी मृत तरुणीच्या नातेवाईकांनी आरोपी पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
First published:

Tags: Crime news, Madhya pradesh

पुढील बातम्या